Nitin Gadkari : पारडी मार्केटबाबत काय म्हणाले नितीन गडकरी?

Nagpur
NagpurTender
Published on

नागपूर (Nagpur) : प्रस्तावित पारडी मार्केटमध्ये नागरिक व विक्रेत्यांसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिले. प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मार्केटमध्ये रेस्टॉरंट फूड कोर्टचा समावेश करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Nagpur
Nashik : सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये 16 पर्यटनस्थळे उभारणार

पारडी येथील प्रस्तावित मार्केटच्या कामासंदर्भात त्यांनी वर्धा मार्गावरील निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीला आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, मेट्रोचे संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक आशिष असाटी आदींची उपस्थिती होती.

पारडी येथील उड्डाणपुलाचा भाग म्हणून शेजारच्या जागेवर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भाजी व मटण मार्केट उभारणार आहे. या भागात रस्त्यावर भरणारा बाजार वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असून, त्यामुळे आरोग्याच्याही अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. बाजारपेठ एका छताखाली आणल्यास या समस्येवर मात करता येईल, या उद्देशाने गडकरी यांच्या संकल्पनेतून पारडी मार्केट उभारण्यात येणार आहे.

Nagpur
Eknath Shinde : 29 किमी लांब 'ठाणे रिंग मेट्रो' टप्प्यात; केंद्रीय मंत्री सकारात्मक

या प्रकल्पासंबंधी विविध प्रक्रियेचा

गडकरी यांनी यावेळी आढावा घेतला. येथे भाजी बाजारासह मटन मार्केट, फळ मार्केट विकसित करताना जास्तीत जास्त गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था देखील असणे आवश्यक आहे. मटन मार्केटसोबत कोल्ड स्टोरेजचीही व्यवस्था करण्यात यावी. या मार्केटची संपूर्ण रचना ही सर्वसामान्यांचे हित ध्यानात घेऊनच करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ड्रॅगन पॅलेसचा मार्ग दुरुस्त करा

कामठी येथील ड्रॅगन पॅलेसकडे जाणारा अंडरपास धम्मचक्र प्रवर्तनदिनापर्यंत नागरिकांसाठी खुला करण्याच्या सूचना गडकरी यांनी रेल्वे विभागाला दिल्या. कामठी येथील ड्रॅगन पॅलेसकडे जाण्यासाठी दोन मार्ग महत्त्वाचे असून सध्या एका ठिकाणी रेल्वेतर्फे आरयूबी व दुसऱ्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे आरओबीचे काम सुरू आहे. हे दोन्ही रस्ते 22 अक्टोबरपूर्वी वाहतुकीसाठी सुरू करून नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com