Nagpur: गडकरींच्या शहरातील रस्त्यांवरचे खड्डे थेट न्यायालयात...

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : प्रजापतीनगर ते पारडी मार्गावरील खड्यांचा (Potholes) मुद्दा आज मुंबई उच्च न्यायालयाच्या (Hing Court) नागपूर खंडपीठात उपस्थित करण्यात आला. उच्च न्यायालयाने दोन आठवड्यात या प्रकरणात निर्णय घेण्याचे आदेश सुनावणी दरम्यान दिले. रस्ता सुरक्षेच्या मुद्यावर परमजितसिंग कलसी यांनी दाखल केलेली जनहित याचकेवर (PLI) नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू झाली आहे.

Nitin Gadkari
Davos : महाराष्ट्र उद्योजकांच्या पसंतीस; 1 लाख 37000 कोटींचे करार

या प्रकरणी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेमध्ये शहरातील खड्याबाबत न्यायालयाचे लक्ष केंद्रीत करण्यात आले. यामध्ये, प्रजापतीनगर ते पारडी या मार्गाला प्राधान्य देत खड्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गापैकी एक असलेल्या या मार्गावर मेट्रो प्रकल्प आणि रेल्वे ओव्हर ब्रीज (आरओबी)चे काम प्रलंबित आहे.

Nitin Gadkari
Nashik ZP : जलजीवनच्या योजनांचे हस्तांतरण आता सरपंचांऐवजी...

यामुळे, रस्त्याची दुरवस्था झाली असून मार्गावर अनेक खड्डे देखील पडले असल्याचे याचिकाकर्त्यापक्षातर्फे न्यायालयात मांडण्यात आले. सोबतच याचे छायाचित्र देखील न्यायालयात सादर केले. तर, या मार्गावरील मेट्रो आणि आरओबीचे काम प्रगतीपथावर असून मार्गावरील खड्यांबाबत नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे (एनएचएआय) न्यायालयाला देण्यात आली.

तसेच, या मार्गाच्या मध्ये येणाऱ्या एका इमारतीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाधीन असल्याने महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे काम अद्याप प्रलंबित होते.

Nitin Gadkari
Public transport पुणेकरांची अवस्था 'एक ना धड भाराभर..!' कारण...

हा मुद्दा निकाली निघाला असून ही इमारत हटविण्याचे काम सुरू असल्याचेही एनएचएआयतर्फे नमूद करण्यात आले. त्यानुसार, खड्डे आणि इतर समस्यांवर येत्या दोन आठवड्यामध्ये निर्णय घेत शपथपत्र सादर करण्याचे न्यायालयाने सुनावणी दरम्यान नमुद केले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. हर्निष गढीया यांनी व एनएचएआयतर्फे ॲड. अनिश कठाने यांनी कामकाज पाहिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com