Nitin Gadkari : आता बसल्या जागेवर काढता येणार मेट्रोचे तिकीट!

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

Nagpur News नागपूर : आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नाग नदी स्वच्छता प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिले. 2434 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया देखील वेगाने पूर्ण करा असे आदेश गडकरी यांनी दिले आहेत.

Nitin Gadkari
Bullet Train News : मुंबई-अहमदाबाद पाठोपाठ आणखी एका मार्गावर धावणार बुलेट ट्रेन

गडकरी यांनी नाग नदी स्वच्छता प्रकल्पाच्या कामांची माहिती घेऊन सर्व विभागांनी एकत्र येऊन तांत्रिक अडचणी सोडवाव्या असे निर्देश दिले. नागपूर शहर एनएमआरडीए परिसराचा एकत्रित प्रकल्प करून नदीत पुढे अस्वच्छ पाणी जाणार नाही, याचीही काळजी घेण्यात यावी, असे कडक शब्दांत अधिकाऱ्यांना सांगितले. नाग नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या प्रकल्पाचे आर्थिक आणि तांत्रिक मूल्यांकन पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी  गडकरी यांना दिली. शहरातील जलकुंभ आणि पाणी पुरवठ्याचा आढावा देखील त्यांनी घेतला. यावेळी ऑरेंज सिटी स्ट्रीट विकसित करण्याच्या प्रकल्पामध्ये टेंडर काढण्यात दिरंगाई करू नये, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

Nitin Gadkari
Big News : शक्तीपीठ महामार्ग तूर्तास जैसे थे! विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणार निर्णय

दही बाजार, लोहाओळी, पोहा ओळी, अनाज बाजार, हरी गंगा, कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, नेता मार्केट, डिक दवाखाना या विकास प्रकल्पांचे डिझाईन अंतिम टप्प्यात असून त्याच्याही टेंडर लवकरच काढण्यात येतील, अशी माहिती गडकरी यांना देण्यात आली. रामजी पहेलवान रस्ता, एलआयसी चौक, जुना भंडारा रोड येथील भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू करावी तसेच रेल्वे स्टेशन मार्गावरील दुकानदारांची कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करावी, असेही निर्देश गडकरींनी अधिकाऱ्यांना दिले. 

Nitin Gadkari
Mumbai To Shrivardhan : कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! मुंबई ते श्रीवर्धन अवघ्या अडीच तासांत

रवी भवन येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेत नागपूर शहरातील विविध विकासकामांसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

गडकरी यांच्या हस्ते यावेळी महामेट्रोच्या व्हॉट्सएप तिकीट प्रणालीचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले. या प्रणालीमुळे बसल्या जागेवर तिकीट काढणे शक्य होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com