Nandurbar : नंदूरबार, धुळ्यासाठी चांगली बातमी! तापी-बुराई प्रकल्पाबाबत मोठा निर्णय

Lift Irrigation
Lift IrrigationTendernama
Published on

नंदूरबार (Nandurbar) : बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या ७९३.९५ कोटी रुपयांच्या प्रथम सुधारित प्रकल्प अहवालाला शनिवारी (ता. १६) सरकारी निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Lift Irrigation
Nashik : दादा भुसे, छगन भुजबळांनी मिळवलेला 'तो' 61 कोटींचा निधी अडकला आचारसंहिंतेत

तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत असलेल्या या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाला तसेच शिंदखेडा व साक्रीमधील दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा होणार आहे.

या योजनेमुळे नंदुरबार तालुकयातील निंभेल, कंद्र, होळतर्फ, रनाळे, हाठमोहीदा, कोपर्डी, आसाने, खोकराळे, घोटाणे, न्याहाली, बलदाने, भादवड, मांजरे, बहयाने, शनीमांडळ, तिलाली, नलावाडे इत्यादी गावांना ४ हजार हेक्टर सिंचन क्षेत्राला तसेच शिंदखेडा व साक्री तालुक्यातील ३१०० हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावून विहिरीची भूजल पातळी वाढ मदत होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.

दरम्यान, सरकारी निर्णयात म्हटले आहे, की ७३८.४३ कोटी रुपयांच्या कामासाठी तसेच आस्थापना व आनुषंगिक खर्चासाठी रुपये ५५.५२ कोटी तरतूद आहे. सदर प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत व सुधारित प्रशासकीय मान्यता तरतुदीच्या मर्यादेत पूर्ण करण्यात यावे. पाणीसाठ्याचा सिंचनाकरिता जास्तीत जास्त लाभ होईल अशाप्रकारे कामांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करण्यात यावा व त्यानुसार कामे, निविदा प्रक्रिया करण्यात यावी.

संपूर्ण लाभक्षेत्रामध्ये पाणीवापर संस्था स्थापन करून सिंचन व्यवस्थापन पाणीवापर संस्थेस हस्तांतरित करावे. त्यानंतर नलिका वितरण अथवा खुला कालवा या पर्यायांपैकी किफायतशीर पर्याय कार्यकारी संचालक यांनी प्रमाणित करून निवडावा. प्रकल्पाची कामे जून २०२७ पर्यंत व सुधारित प्रशासकीय मान्यता किमतीच्या मर्यादेत पूर्ण करण्याची दक्षता महामंडळाने घ्यावी. पाणीसाठ्याचा सिंचनाकरिता जास्तीत जास्त लाभ होईल अशाप्रकारे कामांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करण्यात यावा व त्यानुसार कामे करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे.

Lift Irrigation
Nashik : नाशिक जिल्ह्यातील 1380 ग्रामपंचायतींसाठी Good News! तब्बल 61 कोटींचा...

तापी बुराई योजना

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना (जि. नंदुरबार) तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत हाटमोहिदा गावाजवळून तापी नदीतून अस्तित्वातील प्रकाशा बॅरेजच्या ऊर्ध्व बाजूमधील पुराचे पाणी उपसा करून सिंचनासाठी ४ टप्प्यांत वापरण्यात येणार आहे. सदर प्रकल्प तापी खोऱ्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील आहे.

सदर प्रकल्पामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील ४३५१ हेक्टर व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका २७३४ हेक्टर असे एकूण ७०८५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. सदर प्रकल्पामुळे नंदुरबार तालुक्यातील ४३५१ व शिंदखेडा येथील २७३४ हेक्टर असे ७०८५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे.

Lift Irrigation
Gunthevari Act : गुंठेवारीबाबत महसूलचा मोठा निर्णय; 5 गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येणार का?

जॅकवेल बांधून लिफ्टद्वारे उचणार पाणी

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना प्रकल्पास ११०.१० कोटी मूळ प्रशासकीय देण्यात आली आहे. प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेत तापी नदीतून प्रकाशा बॅरेजेच्या ऊर्ध्व बाजूस पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी हाटमोहिदा गावाजवळील तापी नदीच्या डाव्या तीरावरून इनटेक चॅनल व जॅकवेल बांधून उपसाद्वारे ४१.४७ दलघमी पाणी उचलणे प्रस्तावित आहे.

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या मूळ प्रशासकीय अहवालानुसार उपसा सिंचन योजनेच्या टप्पा एकमध्ये प्रकाशा बॅरेज मधून अस्तित्वातील वडवद लघुपाटबंधारे तलाव पाणी टाकणे, टप्पा क्र. २ वडवद ते ठाणेपाडा लपा तलावात पाणी टाकणे, टप्पा ३ मध्ये ठाणेपाडा ते शेवट ५६० तलावात पाणी टाकणे, टप्पा क्रमांक ४ सबलाइन ठाणेपाडा ते शनिमांडळ, शनिमांडळ ते बुराई धरण, बुराई धरण ते अमलपाडा पाणी साठविण्याचे प्रस्तावित आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com