नागपुरकरांना 15 ऑगस्टला मिळणार Good News! वाचा सविस्तर...

NMC
NMCTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) ‘आपली बस'च्या (Aapli Bus) ताफ्यात लवकरच १४५ इलेक्ट्रिक बसेस (E-Buses) दाखल होणार आहेत. याकरिता परिवहन विभागाने हरियाणाच्या पीएमआय या कंपनीसोबत करार केला आहे. १५ ऑगस्टपर्यंत १५ बसेस मिळणार असून, उर्वरित बसेस डिसेंबरपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत.

NMC
डिजिटल पेमेंट सुसाट; मे महिन्यात विक्रमी ५९५ कोटींचे व्यवहार

नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक बसेस वर भर देण्यात येत आहे. परिवहन विभागाच्या प्रस्तावानुसार २०२२-२३ पर्यंत १०४.९२ कोटी निधीमधून २३३ मिडी बसेस खरेदी करणे प्रस्तावित असून, २०२१-२२ पर्यंत प्राप्त ७७.५२ कोटी मधून पहिल्या टप्प्यात ११५ इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अंदाजे १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत.

NMC
मुंबईत प्रवेश करा सुसाट; 775 कोटींच्या 'या' पुलाचे काम वायुवेगात

हरियाणाच्या पी. एम. आय. कंपनीचे उपाध्यक्ष संजय नागपाल यांनी चार वर्षांपूर्वी हरियाणामध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला असल्याचे सांगितले. या प्लांटची क्षमता १५०० बसेसचे उत्पादन करण्याची आहे. चाकणमध्ये सुद्धा ५०० कोटींची गुंतवणूक करून बसेसचे उत्पादन करण्याचे प्रस्तावित आहे. कंपनीतर्फे लेह, शिमला, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात यासह अन्य ठिकाणी बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे.

NMC
'या' कारणांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

नागपुरात दाखल होणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित राहणार आहेत. या बसेसची बैठक क्षमता ३० सीट्सची असून १५ प्रवासी उभे राहू शकतात. यामध्ये एल.एम.ओ. बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. सिंगल चार्जिंगवर १५० किमीपर्यंत बस धावू शकते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com