Nagpur : 48 कोटींची डिगडोह-निलडोह पाणीपुरवठा योजना का रखडली?

Water
WaterTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : हिंगणा तालुक्यातील निलडोह व डिगडोह या दोन्ही गावाला पाणीपुरवठा करणारी 44 कोटींची योजना मंजूर होऊन दोन वर्षे झाली आहेत. पण, अजूनही ही योजना पूर्ण न झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. या योजनेच्या कामाची गती वाढवावी, या मागणीचे निवेदन डिगडोह जनहित सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिले.

Water
Shinde-Fadnavis-Pawar : 9 खासगी कंपन्यांना सरकारी नोकर भरतीचे कंत्राट देण्याचा निर्णय मागे घ्या!

ग्रामपंचायत निलडोह आणि डिगडोहसाठी नवीन 44 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर काम सुरू होऊन दोन वर्षे लोटली तरी सुद्धा ही योजना अद्याप पूर्ण झाली नाही.

नागरिकांनी याबाबत स्थानिक आमदार समीर मेघे यांच्याकडे तक्रार केली. यावर त्यांनी सुद्धा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. ग्रामपंचायतने सुद्धा वारंवार या कामाबद्दल पाठपुरावा केला. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे ही संयुक्त नळ योजना वेळेवर पूर्ण झाली नाही. याकडे लक्ष देऊन ही ही योजना तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे पदाधिकारी बबन पडोळे, सतीश काळे, सोनू तिवारी, राकेश उमाळे आदींनी केली.

Water
Nashik : महापालिकेतील 587 पदांची भरती प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरू होणार

नागरिकांच्या मागणीची दखल...

नागरिकांच्या समस्यांच्या लढ्यासाठी कार्य करणाऱ्या डिगडोह जनहित सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत बुरडे यांना निवेदन दिले. यामागे जनतेचाही रेटा होता. त्यामुळे बुरडे यांनी तातडीने दखल घेतली. बुरडे यांनी स्वतःहा योजनेच्या कामाची पाहणी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com