Nagpur : नागपुरातील 'या' ऐतिहासिक तलावाला मिळणार हेरिटेज लूक!

Gandhi Sagar Lake Nagpur
Gandhi Sagar Lake NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर शहराच्या हृदयस्थानी असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून, या ऐतिहासिक तलावाला ‘हेरिटेज लूक’ देण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी तलावाच्या कामाची पाहणी केली.

Gandhi Sagar Lake Nagpur
Nagpur : नवीन नागपूरचा जानेवारीत फुटणार नारळ? 750 कोटींच्या कामांचा 'असा' आहे प्लॅन

या ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प देखील उभारण्यात येत आहे. तसेच तलावालगतच्या परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी प्रसाधनगृहांची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

खाऊ गल्लीचे काय झाले

गांधीसागर तलावालगतच्या खाऊ गल्लीचे लोकार्पण 2020 मध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. खाऊ गल्लीतील 32 डोम व्यावसायिकांना देण्यात आले होते. परंतु, काही महिन्यातच खाऊ गल्ली ही बंद पडली आणि तेथील दुकाने ही सुनसान झाली. या प्रकल्पाला कमीत कमी एक कोटीचा खर्च करण्यात आला होता. परंतु कोट्यवधींचा खर्च करूनही दुकाने बंद पडली आहेत.

Gandhi Sagar Lake Nagpur
Nashik : कळसुबाई शिखरावर जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! रोप-वेला सरकरची मंजुरी

या असणार सुविधा

प्रकल्पाचे सौंदर्यीकरण खुलून दिसावे व आकर्षक वाटावे याकरिता काही बाबी प्रकल्पात अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रकल्पामध्ये विद्युत रोषणाई, उत्तर आणि पूर्व दिशेच्या पाथ वे मधील सुशोभिकरण, फुटओव्हर ब्रिजवरील स्टॅम्पींग व ग्रील, जॅकवेल रिपेअरिंग व विसर्जन टँकचे सुशोभिकरण, भाऊजी पागे उद्यान येथील सुशोभिकरण, तलावाच्या सर्व बाजूने फिल्टर मीडिया जेणेकरून कुठलेही पाणी तलावात जाताना स्वच्छ होवून तलावाच्या पाण्यात एकत्रित होईल, उत्तर दिशेकडील पाथ वे वर प्रस्तावित केलेल्या झाडांसाठी ठिंबक सिंचन योजना तयार करणे. 

तसेच तलावाच्या दक्षिण दिशेस अतिवृष्टीमुळे अंदाजे 46 मीटर लांबीची जुनी UCR भिंत कोसळलेली असल्याने भिंतीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. ही सर्व कामे सुरू असून संपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com