Nagpur: उपराजधानीचे 'नाव मोठं अन् लक्षण खोटं'; कारण...

Transport, Parking
Transport, ParkingTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने असते. या वाहनांवर राज्य परिवहन विभागाकडून अनाधिकृत पार्किंग चालानविरोधी कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई करूनही रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केले जात आहेत.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निवडक भागात पार्किंग प्लाझा (Parking Plaza) तयार होत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. विशेषत: अमरावती रोड, वर्धा रोड आणि पूर्व नागपुरात मोठ्या पार्किंग प्लाझाची गरज आहे. याची दखल घेऊन पूर्व नागपुरातील कढोली येथे 65 कोटी खर्चून ट्रान्सपोर्ट प्लाझा तयार करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हा प्रस्ताव केवळ कागदोपत्रीच राहिला. ट्रान्सपोर्ट प्लाझासाठी दोन भूखंडांची निवड करण्यात आली होती. एक प्लॉट 65 एकरचा तर दुसरा प्लॉट 20 एकरचा आहे, तर अमरावती रोड आणि वर्धा रोडवरील पार्किंग प्लाझासाठी अजूनही कोणतीही योजना करण्यात आलेली नाही.

Transport, Parking
Good News: सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

बजेटमध्ये तरतूद पण काम सुरूच नाही 

नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टतर्फे (NIT) पूर्व नागपुरात ट्रान्सपोर्ट प्लाझा बांधण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. नागपूर ट्रेलर ओनर्स युनियनने प्रस्तावित जागेवर ट्रान्सपोर्ट नगर विकसित करण्याची मागणी केली आहे. यासाठी सुमारे 65 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आराखड्यानुसार ट्रान्सपोर्ट नगर विकसित केल्यास शेकडो वाहने उभी राहण्याची व्यवस्था होईल. मात्र आतापर्यंत या योजनेचे काम सुरू झालेले नाही.

लवकरच केले जाईल

पूर्व नागपुरात ट्रान्सपोर्ट प्लाझासाठी जमीन उपलब्ध नव्हती. कापसी येथील उपलब्ध जमिनीची माहिती दिली आहे. कापसी हे कोलकाता, मध्य प्रदेश, दिल्ली मार्गांनी चांगले जोडलेले आहे. प्रस्तावित जमिनीवर ट्रान्सपोर्ट प्लाझा विकसित करता येईल. येथे 5 हजारांहून अधिक वाहने उभी करता येतील. हे काम लवकर सुरू करणार असल्याची माहिती नागपूर ट्रेलर ओनर्स युनियन चे शैलेंद्र मिश्रा यांनी दिली.

Transport, Parking
Nagpur : ब्रिटीशकालीन पूल कोसळल्याने वाहतूक कोंडी; कधी होणार काम?

समस्येतून सुटका होईल

देशाचा मध्यवर्ती भाग असल्याने ऑरेंज सिटी हे वाहतूक व्यावसायिकांचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथून दररोज शेकडो ट्रक, ट्रेलर व इतर मोठी वाहने ये-जा करतात. काही वाहनांद्वारे मालाची खेप शहरात पोहोचते. वाहनचालक अशी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात, त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते.

नागपूर ट्रेलर ओनर्स युनियनने रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला वाहन पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी पूर्व नागपुरात ट्रान्सपोर्ट प्लाझा बांधण्याची मागणी केली होती. प्रस्तावित ट्रान्सपोर्ट प्लाझामध्ये रेस्ट रूम, रेस्टॉरंट, कॉफी हाऊस, गॅरेज, आरटीओ संबंधित कामासाठी इंटरनेट कॅफे, प्राथमिक रुग्णालय, बँक, एटीएम, पेट्रोल पंप, सुलभ शौचालय आदी वाहनचालकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या ट्रान्सपोर्ट प्लाझातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासोबतच शहरातील वाहतूककोंडी आणि अपघातांच्या समस्येपासूनही दिलासा मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com