आरटीओकडून १५ हजारांची वसुली; अधिकाऱ्यांनी दिले दलालांना कंत्राट

Nagpur RTO

Nagpur RTO

Tendernama

Published on

नागपूर (Nagpur) : नव्या कोऱ्या आणि कंपनी लोडेड व्यावसायिक वाहनांची गरज नसताना ब्रेक टेस्ट आणि योग्यता चाचणीच्या नावाखाली प्रत्येकी १५ हजार रुपये उकळण्यात येत असल्याचा प्रकार नागपूर आरटीओ (RTO) कार्यालयात सुरू आहे. गाडी मालकांना शोधून आणण्यासाठी वाहतूक व्यवसायातील काही लोकांना अलिखित कंत्राट देण्यता आल्याचे समोर आले आहे.

Nagpur RTO

3 कोटींच्या सिमेंट रस्त्याला दोन वर्षात भेगा; कंत्राटदारावर प्रश्न

एक वाहनमालकाने यावर आक्षेप घेतला असता आरटीओ कार्यालयातील एका दलालाने त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. आरटीओ कार्यालयात आणि अधिकाऱ्यांच्या पुढ्यातच हा प्रकार झाला असतानाही अद्याप कार्यालयामार्फत त्याची तक्रार करण्यात आली नाही. वाहन मालकाने थेट फोनवरून पोलिसांना कळवल्यानंतर ट्रक वाहनचालक संघटनेच्यावतीने त्यांना तक्रार मागे घेण्यास लावली. नागपूर आरटीओ कार्यालयात झालेल्या घटनेचा आणि वाहन चालकांच्या संघटनेचा काही संबंध नसताना संघटनेचे कार्यकर्ते तत्काळ तेथे कसे पोहचले आणि मध्यस्थी करण्याचे कारण काय अशा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वाहन चालक संघटनेच्या माध्यमातून आरटीओतील काही अधिकारी वाहन मालकांकडून वसुली करीत असल्याची चर्चाही आहे.

Nagpur RTO

Exclusive ठग्ज ऑफ पुणे; अधिकारी, बोगस लाभार्थ्यांचे भूसंपादन रॅकेट

नवे वाहन असतानाही फिटनेस टेस्ट, ब्रेक टेस्ट तसेच योग्यता प्रमाणपत्रांची चाचणी करण्यासाठी वाहन आरटीओ कार्यालयात जमा करण्यास सांगतिले जाते. तासंतास वाहनांना रोखून ठेवल्या जाते. अशा तक्रारी होत्या. याची दखल घेत परिवहन आयुक्तांनी २५ जानेवारी २०१९ रोजी एक स्पष्ट आदेश काढला आहे. नवे वाहन असल्यास ते आरटीओमध्ये जमा करण्याची व त्याची ब्रेक टेस्ट घेण्याची गरज नाही. ऑनलाईन शुल्क भरून वाहनांची नोंदणी करता येते. असे असतानाही आरटीओचे अधिकारी नवीन वाहन असतानाही आरटीओ कार्यालयास आणण्यास सांगतात.
टाटा आणि अशोक लेलँड या कंपन्या बॉडीसह पूर्ण स्वरुपात वाहनांची निर्मिती करतात. याची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार व रितसर केली जाते. यासाठी लागणारे शुल्क आधीच जमा केले असतात.

Nagpur RTO

स्टेशनरी घोटाळा चौकशी समितीत आता निवृत्त न्यायाधीश

विक्रीनंतर ग्राहकांना याकरिता नोंदणीच्यावेळी योग्यता प्रमाणपत्र चाचणी शुल्क आकरण्याची गरज नसते. पूर्ण निर्मित वाहनांसाठी २२ क्रमांकाचा फॉर्म दिला जाते. याचा अर्थ कंपनीच्या माध्यमातूनच संपूर्ण संबंधित वाहन लोडेड असते. ‘२२ ए‘ असा फॉर्म असल्यास कंपनीकडून फक्त वाहन घेण्यात आले. बॉडी बाहेरून बसवली असा त्याचा अर्थ होते. या वाहनांची चाचणी करणे आणि शुल्क घेण्याची परवानगी आहे. मात्र आरटीओ कार्यालयामार्फत सरसकट सर्वच वाहनांकडून पैसे उकळल्या जात आहे.

Nagpur RTO

नागपूर स्टेशनरी घोटाळा; कंत्राटदारांची देयके अन् कामे खोळंबली

व्यावसायिक प्रकाश वंजारी यांनी अलीकडेच दोन व्यावसायिक वाहन खरेदी केले आहेत. नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात गेले असतान त्यांना वाहन आणण्यास सांगितले. सोबतच शुल्क म्हणून १५ हजार रुपये भरावे लागले असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी या संदर्भात शासनादेशाची माहिती संबंधित आरटीओ कार्यालयातील अधिकऱ्यास दिली. या दरम्यान येथे उपस्थित असलेल्या एका दलालाने त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आरटीओ कार्यालयातूनच वसुली एजंट ठिकठिकाणी पेरले असल्याचे दिसून येते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com