नागपूर (Nagpur) : मुख्य रेल्वेस्थानकाला 'जागतिक दर्जा'चे स्टेशन बनविण्याकरिता पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. आता पर्यंत पार्किंग क्षेत्राच्या स्थलांतरणासह 4 कोटीची कामे पूर्ण झाली आहेत.
हेरिटेज म्हणून ओळख असलेल्या नागपूर मुख्य रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाकरिता 487.77 कोटी रुपये खर्च करून ते 'जागतिक दर्जा' चे बनविण्यात येणार आहे. पुनर्विकास कामाला सुरवात झाली असून स्थानकावरील माती परिक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. यासह पश्चिम बाजूला केबल शिफ्टिंग, साइट लॅब चालू करणे, बॅचिंग प्लांटची स्थापना, पूर्वेकडील युटिलिटी शिफ्टिंग, रहदारीसाठी नवीन प्रवेशद्वार, पार्किंग क्षेत्राचे स्थलांतर, व्हील वॉश युनिटची स्थापना करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत पूर्व व पश्चिम बाजूने उत्खनन आणि पश्चिमेकडील मनपाच्या जुन्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. मुख्य रेल्वेस्थानच्या पुर्नविकासात आतापर्यंत 4.07 कोटी रुपये खर्च करून 5 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
पुनर्विकास कामाची व्याप्ती
- नागपूर स्थानकाची हेरिटेज ऐतिहासिक वास्तू जतन करून तिच्या मूळ वैभवात पुनर्संचयित केले जाईल. प्रवाशांचे आगमन आणि प्रस्थान वेगळे केले जाईल.
- मेट्रो आणि वाहतुकीच्या इतर पद्धतींशी एकीकरण केले जाईल.
- रस्त्यावरील वाहनांसाठी परिभाषित ड्रॉप-ऑफ आणि पिक-अप क्षेत्र विकसित केले जातील.
- वेस्ट साइड स्टेशन बिल्डिंग मॉडिफिकेशन आणि ईस्ट साइड बिल्डिंग मॉडिफिकेशन कंट्रोल्स केले जाईल.
- पुरेशी आसनक्षमता आणि कॉर्नकोस प्रतीक्षा क्षेत्र बनविले जाईल. रिटेल कॉनकोर्स क्षेत्र विकसित केले जाईल. पश्चिम बाजूला आणि पूर्व बाजूला तळघर पार्किंग स्थळ बनविले जाईल.
- रूफ प्लाझा कॉनकोर्स प्लॅटफॉर्मच्या वर बनविले जाणार
- 2 नवीन FOB (फूट ओव्हर ब्रिज) बनविले जाणार. सोबतच 28 नवीन लिफ्ट बसवल्या जातील. 31 नवीन एस्केलेटर बसवले जातील. दिव्यांगजन अनुकूल डिझाइन, सुरक्षा आणि प्रवेशासाठी सीसीटीव्ही, सौरऊर्जा, जलसंधारण, रेनवॉटर हार्वेस्टिंगसह हरित इमारती, प्रवासी वाहतुकीसाठी स्थान उपलब्ध केले जाईल.