नागपूर (Nagpur) : नागपूर रेल्वे स्टेशन येत्या काळात प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देणार आहे. पूर्वेकडील गेटवर 5 मजली इमारत बांधण्यात येणार आहेत. यामध्ये एकापेक्षा जास्त आगमन आणि प्रस्थानाची सुविधा असणार आहे. याशिवाय पुनर्विकासानंतर प्रवाशांना येथे अनेक नवीन सुविधांचा लाभ मिळणार आहे. सध्याच्या परिस्थितीत काम वेगाने सुरू आहे. अशा स्थितीत नागपूर स्टेशनचा लवकरच कायापालट झाल्याचे चित्र समोर येत आहे.
भारतीय रेल्वे नेटवर्कमधील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकाचा मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरू असून, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. वाढत्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूंचा कायापालट होणार आहे.
या प्रकारे होणार विकास
पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंनी प्रवाशांचे नवीन आगमन आणि निर्गमन इमारतींनी केले जाईल. एक प्रशस्त 108x52 मीटर रूफटॉप प्लाझा विहंगम दृश्य आणि कॅफेटेरिया सारख्या प्रवाशांना सुविधा मिळेल. सोबतच आरामदायक आणि सोयीस्कर प्रतीक्षा क्षेत्र बनविल्या जाणार आहे. आगमन आणि निर्गमन क्षेत्र वेगळे केल्यामुळे प्रवशांची गर्दी कमी होणार. आगामी मेट्रो स्टेशन आणि इतर वाहतूक पद्धतींसह एकीकरणामुळे सुरळी मल्टीमॉडल प्रवास सुनिश्चित होईल.
28 लिफ्ट, 28 एस्केलेटर आणि अपंग प्रवाशांसाठी सुलभ पायाभूत सुविधांसह हे स्टेशन पूर्णपणे अपंगांसाठी अनुकूल असेल. उत्तम प्रकाश व्यवस्था, स्पष्ट संकेत, पुरेशी प्रतीक्षा क्षेत्र आणि आधुनिक सुविधा प्रवाशांचा अनुभव वाढवेल. सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रवेश नियंत्रण प्रणालीमुळे प्रवाशी सुरक्षित राहणार.
पर्यावरणपूरक इमारत असणार
पर्यावरणपूरक कामकाजासाठी सौरऊर्जा, जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवून ठेवणारे हे स्टेशन ग्रीन बिल्डिंग असेल.