Nagpur : ड्रॅगन पॅलेसबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा; 214 कोटीतून..

Dragon Palace
Dragon PalaceTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेंपलमुळे (Dragon Palace Temple) कामठीसह नागपूरचे नाव जगभरात पोहोचले आहे. या ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट देण्यासाठी देश विदेशातील हजारो नागरिक येतात. या पॅलेसच्या परिसरात लवकरच 214 कोटींच्या विविध कामांना सुरवात होत आहे. त्यातून दोन ते तीन हजार नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचे केंद्रीय रस्ते, परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.

Dragon Palace
Pune : विद्यापीठ चौकातील पुलाबाबत ठेकेदार कंपनीचा मोठा खुलासा

ड्रॅगन पॅलेस टेंपल परिसरात कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. सोबतच ड्रॅगन पॅलेसच्या विस्तीर्ण परिसरात रोजगाराभिमुख प्रकल्पांची उभारणी व्हावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.

यावेळी ड्रॅगन पॅलेस परिसरात कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यासोबतच ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन, ड्रॅगन पॅलेस यात्री निवास, आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृह आणि फूड कोर्टचेही उद्घाटन करण्यात आले.

Dragon Palace
Nashik : लवकरच नाशिकच्या रस्त्यांवर धावणार एसटीच्या 'एवढ्या' ई-बस

ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार 

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध विहार आहे. या विहाराची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली. हे विहार सुमारे 10 एकर जागेवर बांधलेले आहे. या विहाराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. येथील बुद्धमूर्ती ही एका सलग चंदनाच्या ठोकळ्यापासून बनविलेली एक सुंदर मूर्ती आहे. 

आता ड्रॅगन पॅलेस टेंपल परिसरात स्थानिय लोकांना रोजगार मिळण्याचे रस्ते मोकळे झाले आहेत. यासाठी पूर्व राज्य मंत्री आणि ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापक अॅड. सुलेखा कुंभारे यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com