Nagpur News : नागपुरातील वाहतूक कोंडी फूटणार का? 164 कोटींच्या टेंडरसाठी 'या' 2 कंपन्यांत स्पर्धा

Nagpur City
Nagpur CityTendernama
Published on

Nagpur News नागपूर : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी (Traffic In Nagpur) दूर करण्यासोबतच सिग्नल व्यवस्था एकाचवेळी कार्यान्वीत होण्यासाठी (सिंक्रोनाईस) 197 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Nagpur City
Solapur : माढा तालुक्यातील दुष्काळी गावांचा प्रश्न मिटणार; सीना-माढा योजनेला...

वाहतूक सुरळीत करण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या होत्या. या अनुषंगाने नागपूर महानगर पालिकेने IITM (इंटेलिजेंट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट) साठी 164 कोटीचे टेंडर 17 मे 2024 ला काढले. या कामासाठी टेंडर भरण्याची शेवटचा दिनांक 6 जून 2024 होता. या टेंडरसाठी अनेक कंपन्या समोर आल्यात पण दोन कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे.

27 जून रोजी टेंडर ओपन करण्यात आले. तर केलट्रोन आणि एलएनटी या दोन कंपन्या टेंडरसाठी पात्र ठरल्या आहे. तरी सुद्धा तांत्रिक बाबीमध्ये दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे. येणाऱ्या एक महिन्यात टेंडर कोणाला मिळेल हे स्पष्ट होईल.

Nagpur City
Gondia News : गोंदिया जिल्ह्यात 'या' जमिनीला का आलाय सोन्याचा भाव?

इंटेलिजेंट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टीम मुळे संपूर्ण शहराचे ट्रैफिक नियंत्रित केले जाईल. एकाचवेळी अनेक चौकातील ट्रैफिक सिग्नल वर नियंत्रण ठेवता येईल. तर या इंटेलिजेंट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टीममुळे वाहने देखील स्कॅन केले जातील. या अंतर्गत ट्रॉफिक सिग्नलच्या सिंक्रोनायझेशनचा 197 कोटी 63 लक्ष रुपयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, येत्या जून पासून टेंडर उघडताच कामाला सुरवात होणार आहे.

शहरातील वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये दहा टोइंग व्हॅन, पाच अतिरिक्त इंटरसेप्टर वाहनांचा समावेश आहे. या कामासाठी नागपूर महापालिकेला 194 कोटी मिळाला आहे. त्यातून 164 कोटीचे टेंडर काढण्यात आले आहे. उर्वरित निधी इतर कामांमध्ये उपयोग केले जाईल.

Nagpur City
Pune News : गुंठेवारी करून घरे नियमीत करण्याबाबत काय केली पुणे महापालिकेने घोषणा?

24 अपघात प्रवण स्थळांची विशेष दुरुस्ती

नागपूर शहर व परिसरात 23 अपघात प्रवण स्थळ निश्चित करण्यात आले असून भविष्यात अपघात होणार नाहीत यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिकेतर्फे 15 अपघात प्रवण स्थळांवर गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग, सूचना फलक, सिग्नल व्यवस्था, अतिक्रमण निर्मुलन तसेच डिव्हायडर दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.

अपघात प्रवण स्थळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणांवर यापूर्वी झालेले अपघात, जिवीत हानी तसेच अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना केल्या जाणार आहे. रस्त्यावर पार्कीगमुळे होणारा वाहतूक अडथळा दूर करण्यासाठी शहरात 75 रस्त्यांची निवडकरून ऑन स्ट्रीट पार्कींगची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्कींगसाठी विविध भागात जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासोबतच बळकस चौक, नेताजी मार्केट, महात्मा फुले भाजी बाजार आदी ठिकाणी पार्कींगची सुविधा तसेच वाहन तळासाठी राखीव असलेल्या जागेचा शोध घेतले जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com