Nagpur News : घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर नागपूर महापालिकेला आली जाग; शहरात किती आहेत अवैध होर्डिंग?

Ghatkopar Hoarding Accident
Ghatkopar Hoarding AccidentTendernama
Published on

Nagpur News नागपूर : मुंबईत घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमुळे (Ghatkopar Hoarding Accident) भव्य आकारातील होर्डिंगच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

उपराजधानी नागपूरचा विचार केल्यास महानगरपालिकेची आऊटडोअर अॅडव्हरटायजिंग पॉलिसी आहे. त्यानुसार शहरातील होर्डिंगच्या स्ट्रक्चरची प्रत्येक दोन वर्षांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी तपासणे बंधनकारक आहे. पण स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी खरच तपासली जाते का, हा चर्चेचा विषय आहे.

Ghatkopar Hoarding Accident
स्मार्ट मीटर्सची टेंडर दुप्पटीने फुगवली; 'अदानीं'ना सर्वाधिक 14 हजार कोटींची टेंडर

नागपूर महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह (होर्डिंग्स) परवाना विभागाद्वारे शहरातील विविध भागात लावलेले आकाश चिन्ह (होर्डिंग) व ज्यावर आकाश चिन्हे उभारले आहेत, अशा स्ट्रक्चरच्या सर्वेक्षणाला बुधवार पासून सुरवात झालेली आहे.  

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात सर्वेक्षण करण्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभागाद्वारे दोन पथक गठित करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकामध्ये प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पथकाकडून सर्वेक्षणात होर्डिंग्स हे अनुमती दिलेल्या आकारा एवढेच आहे की कसे? होर्डिंग्स अनुमती अन्वये आहे किंवा बिनाअनुमतीचे आहे, तसेच होर्डिंगकरिता उभारलेल्या स्ट्रक्चरच्या स्थिरतेबाबत स्ट्रक्चरल ऑडीट झाले आहे किंवा कसे? या बाबत सर्वेक्षणात माहिती गोळा करण्यात येत आहे.

अभिकरणांनी विनाअनुमतीने होर्डिंग्स उभारले किंवा अनुमती देतांना ज्या अटी व शर्ती अन्वये बंधने घातलेली आहेत त्या बंधनाचे उल्लंघन केलेले आहे, असे सर्वेक्षाणामध्ये आढळल्यास अशा अभिकरणांवर नियमान्वये त्वरीत कार्यवाही करण्यात येणार आहे. 15 दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Ghatkopar Hoarding Accident
Haldiram For Sale : असे काय झाले की 'हा' देशी ब्रँड विकण्याची वेळ आली?

शहरातील 1053 होर्डिंग्स वैध का अवैध ?

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात खासगी मालमत्तेवर होर्डिंग्स करीता स्ट्रक्चर उभारून होर्डिंग्स प्रदर्शित करण्याची सक्षम प्राधिकरणांनी अनुमती प्रदान करून 1053 होर्डिंग्स उभारलेली आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम 244 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (होर्डिंग्स व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण) नियम 2022च्या तरतूदी अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात होर्डिंग्स करीता स्ट्रक्चर उभारून होर्डिंग्स प्रदर्शित करण्याची अनुमती मनपा सक्षम प्राधिकरणाकडून देण्यात येते.

उक्त तरतुदी अंतर्गत अनुमती देताना जवळपास 13 दस्ताऐवज सादर करून घेऊन दस्ताऐंवजाचे तपासणी व मौका चौकशी करून अनुमती देण्यात येते. होर्डिंग्स करीता आवश्यक स्ट्रक्चर हे स्ट्रक्चरल इंजीनिअर कडून डिझाईन करून घेतल्या प्रमाणेच उभारण्यात आल्याचे व उभारलेल्या स्ट्रक्चरची स्टॅबीलीटी हे स्ट्रक्चरल इंजीनियर मार्फत प्रमाणीत करून घेतली जाते. 15 दिवसाच्या नंतर समोर येणार की, या सर्व होर्डिंग्स नियमाच्या आहेत का? नसल्यास होर्डिंग्स धारकांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

Ghatkopar Hoarding Accident
Sambhajinagar : परवानगी नसतानाही AC च्या हवेने सरकारी अधिकारी चिल!

हायकोर्टाकडे स्ट्रक्चरल ऑडिटची केली होती मागणी : 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शहरामधील अवैध होर्डिंगसंदर्भात याचिका प्रलंबित आहे. परिवर्तन संस्थेचे सचिव दिनेश नायडू यांनी ही याचिका दाखल केली आहे.  या प्रकरणात न्यायालयाने वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यामुळे मनपाने 'आऊटडोअर अॅडव्हरटायजिंग पॉलिसी' लागू केली आहे. नायडू यांचे वकील अॅड. तुषार मंडलेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ऑडिट व्हावे, यासाठी उच्च न्यायालयाला आदेशाची मागणी करणार असल्याचे सांगितले.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात खासगी मालमत्तेवर आकाश चिन्हाकरिता स्ट्रक्चर उभारून आकाशचिन्ह प्रदर्शित करण्याची सक्षम प्राधिकरणांनी अनुमती प्रदान करून 1053 आकाशचिन्ह उभारलेली आहेत. आकाशचिन्हकरिता आवश्यक स्ट्रक्चर हे स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून डिझाइन करून घेतल्याप्रमाणेच उभारण्यात आल्याचे व उभारलेल्या स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी ही स्ट्रक्चरल इंजिनिअरमार्फत प्रमाणित करून घेतली जाते. या सर्वेक्षणात स्ट्रक्चरची नियमानुसार तपासणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com