Nagpur : नागपूर महापालिकेने 8 वेळा काढले 'ते' टेंडर? प्रतिसाद का मिळेना?

NMC
NMCTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात कुठेही आग लागल्यानंतर तत्काळ त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक हायड्रेटचा प्रस्ताव गेल्या सात वर्षांपासून धूळखात पडला आहे. विशेष म्हणजे सिमेंट रस्ते झाल्याने ते पुन्हा खोदणे, त्यासाठी लागणारा वेगळा खर्च आदीमुळे आठ वेळा टेंडर काढूनही कुणीही ठेकेदारही दाद देत नसल्याने आगीवर तत्काळ नियंत्रणाबाबत महापालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे.

NMC
Nashik : रोजगार हमीत उजळमाथ्याने ठेकेदारीला प्रवेश; आमदारांची दीड हजार कोटींची...

शहरात एकेकाळी 1100 हायड्रेट होते. त्यामुळे कुठेही आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पाण्यासाठी भटकावे लागत नव्हते. गेल्या काही वर्षांत शहर वाढले, सिमेंट रस्ते झाले. यात जुने हायड्रेट गडप झाले. परिणामी सद्यास्थितीत आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या बंबाला जलकुंभाकडे धाव घ्यावी लागते. यातच बराच वेळ निघून जात असल्याने आगीत होणाऱ्या नुकसानीचा आकडा वाढत आहे.

यावर अग्निशमन विभागाने 2016 मध्ये नवीन हायड्रंडचा 1 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. शहरातील जलवाहिन्यांची जबाबदारी असलेल्या विभागाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याचवेळी टेंडरही काढण्यात आली होती. परंतु हायड्रेटसाठी कुणीही ठेकेदार पुढे आला नाही. त्यानंतर आतापर्यंत सात वेळा काढण्यात आलेल्या टेंडरलाही कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही.

परिणामी हा प्रस्ताव आता धूळखात पडला आहे. गेल्या सात वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झाले. हायड्रेटसाठी जलवाहिन्या शोधण्याकरिता सिमेंट रस्ते खोदणे, पुन्हा ते पूर्ववत करणे, यासाठी वेगळी यंत्रणा लागणार असल्याने खर्चातही मोठी वाढ होणार आहे. हा प्रस्ताव एक कोटींचाच असल्याने कुणीही कंत्राटदार पुढे येत नसल्याचे सूत्राने नमूद केले. 

NMC
Nashik ZP : मिशन भगिरथच्या मार्गातील अडथळे दूर; नवीन आराखड्याची तयारी सुरू

अग्निशमन विभागाकडे खर्चाची तरतूद असूनही कंत्राटदारच पुढे येत नसल्याने महापालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरात आगीच्या घटनांत वाढ झाली असून, आर्थिक नुकसानीचेही आकडे वाढत आहेत.

हायड्रेट नसल्याने पाण्यासाठी जलकुंभापर्यंत बंब घेऊन जाणे व परत येणे, यात बराच वेळ जात असल्याने अनेकदा आग रौद्ररूप धारण करत असून नुकसानही मोठे होत आहे.

काय आहे हायड्रेट?

शहरातील जलवाहिनीवर हँडपंपसारखे मोठे उपकरण लावल्या जाते. हे उपकरण ठिकठिकाणी असते. त्यामुळे ज्या परिसरात आग लागली असेल तेथेच पाण्याची सोय उपलब्ध होत असल्याने आगीच्या घटनेतील नुकसान कमीत कमी होते.

पहिला हायड्रेट 1873 साली

सुरुवातीला हॅन्डपंपमधून पाण्याचा वापर केला जात होता. 1873 मध्ये अंबाझरी तलावातून शहराला पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर हॅन्डपंप इतिहास जमा झाले. अग्निशमन बंबात पाणी भरण्यासाठी मुख्य जलवाहिनीवर सर्वप्रथम 97 हायड्रेट लावण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com