नागपूर महापालिकेचा उलटा कारभार! रस्ता नसताना टाकली ड्रेनेज लाईन

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) ः नागपूर शहरात (Nagpur City) एखादी वस्ती वसल्यानंतर सर्वप्रथम तेथे रस्ते, विज, सिवेज लाईनची सुविधा करून दिली जाते. परंतु महापालिकेकडून दुर्लक्षित भांडेवाडी परिसरातील पवनशक्तीनगरात सिवेज लाईन, रस्त्यांऐवजी ड्रेनेज लाईन टाकल्या जात आहे. पैशाची उधळपट्‍टी आणि कंत्राटदारांचे खिसे गरम करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Nagpur
अकोट शहरातील विकास कामांना दणका; 12 कोटींच्या टेंडरला स्थगिती

भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या अगदी समोर पवनशक्तीनगर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही वस्ती सुविधांच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. रस्त्यांच्या नावावर केवळ माती, गिट्टी आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना अक्षरशः चिखल, खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यातच काही भागात विजेचे दिवे नसल्याने रात्रीच्या अंधारात अनेकदा ज्येष्ठ नागरिकांची परवड होते. पूर्व नागपुरातील या वस्तीत अद्यापही सिवेज लाईन नाही. त्यामुळे अनेकांनी सेफ्टी टॅंक तयार केले. या वस्तीत रस्ते, वीज, सिवेज लाईनसाठी नागरिकांनी आमदार, तत्कालीन नगरसेवक, महापालिकेकडे अनेकदा निवेदन दिले. परंतु भांडेवाडी म्हटले की महापालिकेप्रमाणेच मते घेऊन सभागृह, विधानसभेत पोहोचणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्षित केले. त्यामुळे वर्षानुवर्षे येथील नागरिक पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत.

Nagpur
मुंबई मेट्रो-3 : 'या' तारखेला धावणार पहिली प्रोटोटाइप मेट्रो

त्यातच भांडेवाडी डम्पिंग यार्डमधून येणारी दुर्गंधी, उन्हाळ्यात आगीनंतर पसरणाऱ्या विषारी धुराने येथील नागरिकांचे जगणे कठीण केले. रस्ते, सिवेज लाईन, पथदिवे याकडे दुर्लक्ष करीत महापालिकेने या भागात आता ड्रेनेज लाईनची कामे सुरू केली आहे. पावसामुळे ही कामेही अर्धवट असल्याने अऩेक ठिकाणी चेंबरसाठी खोदण्यात आलेले खड्डे, काही ठिकाणी चेंबरची अर्धवट कामे असून त्यात नागरिक पडण्याचीच शक्यता येथील नागरिक रोशनी कास्तकार यांनी व्यक्त केली.

Nagpur
मुंबईत आता 'याठिकाणी' इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स

या खोदकामात पाणी भरले असून रस्त्याच्या लगत असल्याने वाहनचालकांनाही अंदाज येत नाही. त्यामुळे अऩेकदा दुचाकीस्वारांचा अपघात झाला. काही भागात ड्रेनेज लाईनची कामे झाली. यात पावसाचे पाणी तुडूंब भरले आहेत. परिणामी त्यात डास आदी तयार झाले आहेत. त्यामुळे विविध आजाराचा संसर्गही येथील नागरिकांना झाला आहे.

Nagpur
Big News! 'या' 2 शहरांत L&T करणार तब्बल 8000 कोटींची गुंतवणूक

ड्रेनेजलाईनचा वापर सिवेज लाईनसारखाच
या भागातील अनेक नागरिकांना ड्रेनेज लाईन व सिवेज लाईनमधील फरकच कळत नाही. त्यामुळे ड्रेनेज लाईनचा वापर सिवेज लाईनसारखाच होण्याची भीती शालू साठवणे या महिलेने व्यक्त केली. त्यांच्या घरासमोरच ड्रेनेज लाईनचे चेंबर असल्याने भविष्यात दुर्गंधी आदीची मोठी समस्या निर्माण होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. सर्वप्रथम सिवेज लाईन, रस्ते तयार करण्याची गरज असून महापालिकेने उलट काम सुरू केल्याची टीकाही त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com