नागपुरात कचऱ्यातून उर्जेसह बायो सीएनजी, बायोगॅस, खते तयार करणार

garbage
garbageTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : शहरातून दररोज निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रश्न आता कायमचा मिटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कचऱ्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेने नेदरलॅंडच्या सस्टेनेबल बिजनेस डेव्हलपमेंट कंपनीसोबत अंतिम टप्प्यातील चर्चा झाली असून, लवकरच करार करण्यात येणार आहे. ही कंपनी कचऱ्यातून उर्जानिर्मितीसह बायो सीएनजी, बायोगॅस, खते तयार करणार आहे.

garbage
सोमय्यांच्या दणक्यानंतर परबांचे रिसॉर्ट पाडण्याचे निघाले टेंडर

या प्रकल्पासाठी महापालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. यापूर्वीसुद्धा नागपूर महापालिकेने वीज निर्मितीचा प्रयत्न केला होता. मात्र तो फसला. शहरातून दररोज ओला व सुका एक हजारावर टन कचरा गोळा केला जातो. महापालिकेने घराघरातून कचरा गोळा करण्यासाठी दोन कंपन्यांची नियुक्तीही केली आहे. परंतु गोळा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वी कचऱ्यावर प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांनी पळ काढला. कचऱ्यावर बायोप्रक्रियेचाही उपाय महापालिकेने शोधला. परंतु त्यातही हवे तसे यश महापालिकेला मिळाले नाही. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया महापालिकेसाठी डोकेदुखी ठरली होती.

garbage
मुंबईच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर; BKC सारखी आणखी ८ इकॉनॉमिक हब

आता मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून महापालिकेची ही डोकेदुखी कायमची दूर होण्याची शक्यता आहे. महापालिकेने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. तसेच सस्टेनेबल बिजनेस डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष जॉप व्हीनेनबॉस यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीला कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या. या कंपनीला भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमधील जागा देण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया करताना महानगरपालिकेला एकही पैसा मोजावा लागणार नाही. नेदरलँड येथील एसयुएसबीडीई कंपनी स्वतःच हा प्रकल्प तयार करणार असून त्याचे व्यवस्थापन, देखभालही करणार आहे.

यापूर्वीचा प्रकल्प गुंडाळला
यापूर्वीही कचऱ्यातून वीज निर्मितीचा प्रकल्पासाठी एका खाजगी कंपनीने पुढाकार घेतला होता. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ९० कोटी रुपये मंजूर केले होते. कंपनीने नागपुरात कार्यालयही थाटले. परंतु वर्षभरातच कंपनीने गाशा गुंडाळला आणि कचऱ्यातून वीज निर्मितीचा प्रकल्प स्वप्नवतच ठरला. आता नेदरलॅंडच्या कंपनीमुळे पुन्हा एकदा कचऱ्यातून वीजनिर्मितीची चर्चा सुरू झाली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com