Nagpur : महापालिकेला अचानक जाग; खड्डे बुजविण्यासाठी केले अभियान सुरु

potholes
potholesTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत नागपूर महानगरपालिकेतर्फे मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात हॉटमिक्स प्लान्ट विभागातर्फे सर्व झोनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांना झोननिहाय खड्डे बुजविण्याचे निर्देश दिलेले आहे.

potholes
EXCLUSIVE : आमदार अण्णा बनसोडे यांनी आरोप केलेले चंद्रकांत गायकवाड आहेत तरी कोण?

हॉटमिक्स प्लान्टतर्फे 1 एप्रिलपासून 7 सप्टेंबर 2023 पर्यंत 3259 खड्डे बुजविण्यात आले आहेत. यामध्ये जेट पॅचर मशीनने 928 खड्डे आणि हॉटमिक्स प्लाँट कडून 2328 खड्डे बुजविण्याचे कार्य करण्यात आले आहे. तसेच 6874 चौरस मीटर खड्डे जेट पॅचेरच्या सहाय्याने आणि 31684 चौरस मीटर खड्डे हॉटमिक्स प्लाँटच्या मशीनद्वारे बुजविण्यात आले आहेत, अशी माहिती हॉटमिक्स प्लान्ट विभागाचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी दिली.

potholes
Mumbai : मलबार हिल्सच्या 'त्या' प्रसिद्ध बंगल्याचे काऊंटडाऊन सुरु

नागपूर मनपाच्या खड्डे बुजाओ अभियानाचे नागरिक स्वागत करीत आहे. कारण नागपूर शहराच्या असंख्य रास्त्यावर खड्डे बनले आहे. भर पावसाळ्यात या खड्डयांमुळे अनेक लोक दुर्घटनाग्रस्त झाले, तरी काही लोकांना आपले जीव गमवावे लागले. स्थानिक नेत्यांनी सोबत नागरिकांनी या खड्डयांच्या विरोधात आंदोलने व प्रदर्शन केले होते. त्याचाच परिणाम नागपूर मनपा खड्डे बुजविण्याच्या कामाला लागली आहे.

झोनअंतर्गत दुरुस्ती केलेले खड्यांची संख्या

लक्ष्मीनगर -  504

धरमपेठ -    175

हनुमाननगर - 287

धंतोली -     245

नेहरूनगर -   437

गांधीबाग -   214

सतरंजीपूरा -  228

लकडगंज -   373

आशीनगर -  356

मंगळवारी -   437

एकूण -      3259

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com