नागपूर : नूतनीकरणासाठी नेमावे लागणार कंत्राटदार अन् लाखोंचा खर्च

Nagpur

Nagpur

Tendernama

Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर सुधार प्रन्यासने महापालिकेला ४४ उद्याने हस्तांतरित केली आहेत. परंतु यातील केवळ तीन उद्याने सुस्थितीत असून इतर उद्यान्यांच्या नूतनीकरणावर महापालिकेला कोट्यवधींचा खर्च करावा लागणार आहे. अक्षरशः कचरा झालेली उद्याने सोपविल्याचे ताशेरे महापालिकेच्या स्थापत्य समितीच्या अहवालातून पुढे आले आहे.

Nagpur

आरटीओकडून १५ हजारांची वसुली; अधिकाऱ्यांनी दिले दलालांना कंत्राट

नागपूर सुधार प्रन्यासद्वारे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या उद्यानांच्या प्रत्यक्ष स्थिती संदर्भातील अहवाल नुकताच स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सुपूर्द केला. हस्तांतरीत करावयाच्या उद्यानांची देखभाल नासुप्रने ५ जुलै २०२० पासून बंद केली. ६ जुलै २०२० पासून ते ५ एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये नासुप्रच्या कंत्राटदार उद्यानांची देखभाल करीत होते. त्यांना पैसे न दिल्यामुळे उद्यानांच्या देखभालीचे काम बंद करण्यात आले. उद्यानांच्या देखभालीसंदर्भात नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता मनपाच्या सभागृहाने ८ सप्टेंबर २०२१ रोजी ही उद्याने हस्तांतरीत करून घेण्यास मंजुरी दिली.

Nagpur

Exclusive ठग्ज ऑफ पुणे; अधिकारी, बोगस लाभार्थ्यांचे भूसंपादन रॅकेट

या उद्यानांची देखभाल करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही स्थापत्य समितीला दिले होते. नासुप्रने महानगरपालिकेला ४४ उद्याने हस्तांतरीत केली. या उद्यानांच्या प्रत्यक्ष स्थितीबाबत समितीद्वारे एकूण पाच वेळा पाहणी करण्यात आली. यामध्ये ४४ पैकी ३ उद्यानांची स्थिती चांगली असून २० उद्याने सर्वसाधारण स्थितीत तर २१ उद्याने अत्यंत वाईट स्थितीत आहेत. ४४ उद्यानांपैकी ३ उद्यानांमध्ये किरकोळ स्थापत्य कामांची गरज असून २० उद्यांनामध्ये पायवाट दुरुस्ती, कम्पाउंड दुरूस्ती, रंगरंगोटीची कामे आणि २१ उद्यानांमध्ये सुरक्षा भिंतीचे बांधकाम, पायवाटेचे नूतनीकरण, ड्रेन लाईन टाकणे, पाण्याची नवीन पाईप लाईन टाकणे याशिवाय अस्तित्वात असलेल्या गार्डरुम, प्रसाधगृह व इतर स्ट्रक्चरलचे नूतनीकरण करणे, सर्व उद्यानातील खेळणी, ग्रीन जिम दुरुस्त करून नवीन साहित्य उपलब्ध करण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Nagpur

कंत्राटदार मुंबई महापालिकेवर मेहेरबान; 30 टक्के बिलो टेंडर

नासुप्रच्या मोठ्या उद्यानातील स्कल्पचर व म्यूरलचे नविनीकरण करणे, कारंज्याची दुरस्ती, नूतनीकरण, योगाशेडची दुरूस्ती, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचेही समितीद्वारे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्व उद्यानांमध्ये देखभालीचा अभाव असून या उद्यानांच्या नव्याने देखभालीच्या निविदा बोलाविणे आवश्यक असून नूतनीकरणावर येणाऱ्या खर्चास सुधारित अर्थसंकल्पात ते ठेवण्यात यावे, असा अभिप्राय स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी अहवालात दिला आहे.

Nagpur

नागपूर स्टेशनरी घोटाळा; कंत्राटदारांची देयके अन् कामे खोळंबली

नासुप्रकडून खर्च वसूल करण्याची शिफारस
उद्यानांच्या देखभालीसंदर्भात नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता मनपाच्या सभागृहाने ८ सप्टेंबर २०२१ रोजी ही उद्याने हस्तांतरीत करून घेण्यास मंजुरी दिली. ६ जुलै २०२० ते आतापर्यंत उद्यानांमध्ये झालेल्या देखभालीचा खर्च, नूतनीकरणावरील खर्च आणि सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर झालेला खर्च नागपूर महानगरपालिकेने नागपूर सुधार प्रन्यासकडून घेण्याची शिफारश समितीने अहवालात केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com