Nagpur : कचऱ्यातून पालिकेला मिळणार 50 टक्के नफा अन् दरवर्षी 15 लाख

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नेदरलँडची सस्टेनेबल बिजनेस डेव्हलपमेंट कंपनी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून CBG (कंप्रेस्ड बायो गॅस) तयार करेल. दररोज 30 ते 35 कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकले जातील. त्यातील 50 टक्के नफा महापालिकेला दिला जाणार आहे. याशिवाय कंपनी दरवर्षी 15 लाख रुपयांची ठराविक रक्कम महापालिकेला देणार आहे. कंपनीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर महापालिका प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी. अशी माहिती दिली.

Nagpur
Mumbai : मेट्रो-३चा मेंटेनन्स करणार 'या' २ कंपन्या; भिडेंची माहिती

नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थानांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरसाठी मुळची नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महापालिकेमध्ये करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे प्रतिदिवस 30 ते 35 टन कंप्रेस्ड बायो गॅसची  (सीबीजी) निर्मीती केली जाईल. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागपूर शहराकरीता घनकचरा व्यवस्थापनाचा सुधारीत विस्तृत प्रकल्प अहवाल शासनाद्वारे 14 मे 2021 रोजी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये अंतर्भूत प्रमुख घटक् 600 TPD कम्पोस्टींग प्रकल्प आणि 380 MTPD MRF Centre करीता एकत्रितरित्या 1000+20% ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरीता मनपाद्वारे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. या निविदेनुसार सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीची नियुक्ती करण्यात आली.

Nagpur
Nashik: TCS राबवणार महापालिकेतील 704 जागांची भरती प्रक्रिया

नागपूर शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्यासाठी सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनीद्वारे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. घराघरातून निघणारा आणि भांडेवाडी येथे डम्प करण्यात आलेल्या दररोज 1200 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे, हे उल्लेखनीय आहे. या कचऱ्यापासून उच्च दर्जाचे कम्पोस्ट, बायोगॅस तयार केले जाईल. संपूर्ण प्रकल्प झिरो वेस्ट विथ नो टींपिंग फीज तत्वावर उभारण्यात येणार आहे. यामुळे महानगरपालिकेची मोठी बचत होईल. विशेष म्हणजे, कच-यावर प्रकिया करून पर्यावरणपूरकरित्या त्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात येणा-या प्रकल्पातून नागपूर महानगरपालिकेला वर्षाला 15 लाख रूपये रॉयल्टी स्वरूपात प्राप्त होणार आहेत. याशिवाय कार्बन क्रेडिटममधून देखील प्राप्त महसूलात मनपाचा 50 टक्के वाटा असेल.

Nagpur
Nagpur : अजनी रेल्वे कॅम्पसमध्ये आरओबीचे काम लवकरच सुरू होणार

पहिल्यांदा या प्रकल्पांपासून मिळणार महसूल

नागपूर शहरातील कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट यावर मनपाद्वारे वेगवेगळ्या माध्यमातून खर्च होत आलेला आहे. मात्र आया तंत्रज्ञान आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक या प्रकल्पाच्या माध्यमातून मनपाला पहिल्यांदाच कचऱ्यातून उत्पन्न मिळणार आहे. सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनीसोबत झालेल्या करारानुसार सुरूवातीला 15 वर्षासाठी हा प्रकल्प असेल. यातील पहिल्या पाच वर्षात त्रयस्थ संस्थेद्वारे प्रकल्पाचे मूल्यांकन केले जाईल यात सकारात्मकता आढळल्यास पुढे आणखी 15 वर्षासाठी प्रकल्पाचा कालावधी वाढविण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी सदर कंपनीला मनपाद्वारे 30 एकर जागा लीजवर दिली जाणार आहे. येत्या वर्षभरात संपूर्ण प्रकल्प शहरात कार्यान्वित होईल.

Nagpur
Nagpur: विरोध डावलून अंबाझरी पार्कातील 'या' प्रकल्पाचे भूमीपूजन

प्रकल्पावर होणार 300 कोटी खर्च

बायो गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचा खर्च सस्टेनेबल बिजनेस डेवलपमेंट कंपनी उचलेल. भांडेवाडी कॅम्पसमध्ये 300 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिका 30 एकर जागा देणार आहे. महापालिका आणि नीदरलैंड च्या कंपनी यांच्यात 15 वर्षांचा करार आहे. कंपनीची कामगिरी समाधानकारक असल्यास करार आणखी 15 वर्षांसाठी वाढविला जाईल. नागपूर शहरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावून शहरात निर्माण होणा-या कच-याचा वेगवेगळ्या माध्यमातून पूनर्वापर व्हावा या मनपाचा मानस आहे. शहर कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाउल असून या संपूर्ण कार्यात शहरातील प्रत्येक नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. घराघरातून, दुकाने, आस्थापनांमधून निघणारा कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा संकलीत करण्यात येतो. मात्र अद्यापही काही नागरिक कचरा व्यवस्थित विलग करून कचरा संकलन करणा-या गाडीत टाकत नसल्याचे दिसून येत आहे. सर्व नागरिकांनी कच-याचे ओला आणि सुका असे योग्य विलगीकरण करूनच कचरा संकलीत करावा, असे आवाहनही यावेळी मनपा आयुक्तांनी शहरातील जनतेला केले आहे. सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंटचे सीईओ जाप विनेनबोस म्हणाले की, नागपूरात उभारल्या जाणा-या प्रकल्पातुन प्रतिदिवस 30 ते 35 टन सीबीजी निर्माण केले जाईल. भविष्यात याचा मोठा फायदा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com