नागपूर महापालिकेकडून आठ हजारांच्या कूलरची ७९ हजारांत खरेदी

cooler

cooler

Tendernama

Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) बाजारात साडेआठ हजार रुपयांचा असलेला कुलर ७९ हजार रुपयांत, चार रुपयांचे जेलपेन ३४ रुपये तर ४४० रुपयांच्या कॅसिओ कॅल्कुलेटर ७८५ रुपयांमध्ये खरेदी केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. यावरुन महापालिकेचे अधिकारी कशा पद्धतीने अंदाधुंद पैसे कमावता हे दिसून येते.

cooler

अधिवेशनात 'बांधकाम'च्या अधिकाऱ्यांची दिवाळी; 4 कोटींची उधळपट्टी

कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीतून हा घोटाळा समोर आला आहे. महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच नगरसेवक संदीप सहारे यांनी महापालिकेने खरेदी केलेले कूलर, पेन, स्टॅपल पिन, चहाचा ट्रे, टर्किश टावेल, चहाचे कप आदीचे दर सांगितले. विशेष म्हणजे सहारे यांनी याच वस्तुंचे कोटेशन बाजारातून विविध एजन्सी व कंपनीकडून मागितले. महापालिकेने खरेदी केलेल्या साहित्याचे दर व बाजारातील दरात मोठी तफावत आढळून आल्याने सहारे यांनी स्टेशनरी व कूलर खरेदीतही मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप केला.

cooler

स्टेशनरी घोटाळा पोहचला अधिवेशनात; नागपूर महापालिकेवर बरखास्तीची...

माहिती अधिकारात महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ४० लिटर क्षमतेचे कूलर ५९ हजार रुपयांत खरेदी करण्यात आले. या कूलरची किंमत बाजारात ८ हजार २४ रुपये आहे. १२० लिटर क्षमतेचे कूलर महापालिकेने ७९ हजार रुपयांत खरेदी केले. या कूलरची किंमत बीएम इंडस्ट्रिजकडून मागविण्यात आलेल्या कोटेशनमध्ये ८ हजार ४९६ रुपये असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सध्या गाजत असलेल्या स्टेशनरी घोटाळ्यातील साहित्याची किंमतही आठ ते दहा पटीने वाढविण्यात आल्याचे सहारे यांनी सांगितले.

cooler

स्टेशनरी घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे;व्याप्ती १०० कोटींत

सहारे यांंनी महापालिकेकडे २०१७ पासूनची साहित्य व स्टेशनरी खरेदी संदर्भातील माहिती २०१९ मध्ये मागितली होती. महापालिकेने दिलेल्या एकूण माहितीपैकी सहारे यांनी १३ जुलै २०१७ ते ९ ऑक्टोबर २०१७ या काळात खरेदी केलेल्या साहित्यांची माहिती सांगितली. महापालिकेने ९.५० रुपये प्रती नग एक, यानुसार दोन हजार पेन खरेदी केली. बाजारात या पेनची किंमत १.९५ रुपये असल्याचे सहारे म्हणाले. प्लास्टिक फोल्डर बॅग महापालिकेने प्रती नग १८७ रुपये दराने खरेदी केली. या शंभर बॅग खरेदी करण्यात आल्या. बाजारात या फोल्डर बॅगची किंमत १० रुपये आहे. जेल पेनची खरेदी प्रति नग ३४ रुपये दराने खरेदी करण्यात आले. या पेनची बाजारात किंमत केवळ ३ रुपये आहे. ही केवळ एका महिन्याची माहिती असून संपूर्ण वर्षभरातील खरेदीत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सहारे यांनी केला.

cooler

टेंडर प्रक्रिया टाळून 93 लाखांची खरेदी;पुरवठा एकाचा बिले दुसऱ्याची

महापालिकेने खरेदी केलेले साहित्य
साहित्य खरेदीचा दर बाजारातील दर
कूलर ४० लिटर - ५९ हजार रुपये - ८ हजार २४ रुपये
कूलर १२० लिटर - ७९ हजार रुपये - ८ हजार ४९६ रुपये
डॉट पेन प्रति नग - ९.५० रुपये - १.९५ रुपये
यू पिन प्लास्टिक कोटेड पॅकेट - १९८ रुपये - २२ रुपये
प्लास्टिक फोल्डर बॅग एक नग - १८७ रुपये - १० रुपये
जेल पेन प्रति नग - ३४ रुपये - ४ रुपये
टेबल रायटिंग पॅड प्रति नग - ४ हजार ४५० रुपये - १ हजार ४०० रुपये
कॅशिओ कॅल्कुलेटर प्रति नग - ७८५ रुपये - ४४० रुपये

महापालिकेने २०१७ मध्ये खरेदी केलेल्या साहित्याची माहिती माहिती अधिकारात दिली. याच साहित्याचे आजच्या स्थितीती दराचे कोटेशन मागविण्यात आले. यात मोठी तफावत आहे. विशेष म्हणजे मनपाने खरेदी केलेल्या साहित्याचे दर स्थायी समितीने निश्चित केले होते. स्थायी समितीची डोळेझाक आश्चर्यकारक आहे.
- संदीप सहारे, नगरसेवक, कॉंग्रेस

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com