नागपूर (Nagpur) : G-20 आंतरराष्ट्रीय बैठकीच्या नावावर नागपुरला स्वच्छ-सुंदर बनविण्यासाठी कोट्यवधी रुपये महापालिकाकडून खर्च केले जात आहेत. शहरातच सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी असल्यामुळे आता नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे 100 स्मार्ट ई-टॉयलेट लावले जाणार आहेत. सार्वजनीक स्वच्छतागृहांची दयनीय स्थिती, पब्लिक टाॅयलेटच्या अभावी महिलांच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न या ई-टॉयलेटमुळे सुटणार आहे.
कोणतेही नाण्यांवर (क्वाईन) वापरता येणार ई टॉयलेट
नागपूर शहरात वर्दळीच्या ठिकाणी हे ई-टॉयलेट बसवले जाणार आहे. एका ठिकाणी महिला आणि पुरुष असे दोन ई-टॉयलेट बसवले जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही नाण्यांमुळेहे ईःटॉयलेट ओपन होणार आहे. आत गेल्यानंतर आपोआप फ्लश होईल आणि बाहेर निघताना सुद्धा फ्लश होईल. यामुळे ई-टॉयलेटमध्ये घाण होणार नाही.
या कंपनीला मिळाले टेंडर
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे शहरात ई-टॉयलेट लावण्याचे टेंडर कर्नाटकच्या इरम सायंटिफिक या कंपनीला देण्यात आले आहे. अंदाजे 1.38 कोटी खर्च करून शहरात 50 ठिकाणी 2-2 ई-टॉयलेट लावले जाणार आहेत. पाच वर्षांपर्यंत कंपनीकडे मेन्टनन्सची जबाबदारी पण दिली गेली आहे.
एप्रिलपर्यंत शहरात लागणार ई-टॉयलेट
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी एप्रिलपर्यंत शहरात ई-टॉयलेट लागणार असल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की या स्मार्ट ई-टॉयलेटमुळे शहरात स्वच्छता राखली जाणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी, बाजार परिसरात लोकांना विशेषता महिलांना त्रास होऊ नये म्हणून ई-टॉयलेट एप्रिल महिन्यापर्यंत लावले जाणार आहेत. सोबतच 5 वर्षापर्यंत ज्या कंपनीला टेंडर दिले गेले आहे, त्यांच कंपनीकडे ई-टॉयलेटच्या मेन्टनन्सची जबाबदारी दिलेली आहे.
लोकांनी केला पाहिजे योग्य उपयोग
नागपूरच्या लोकांसाठी ई-टॉयलेटची संकल्पना नवीन आहे. तर ई-टॉयलेटचा वापर योग्य प्रकारे केला लोकांनी केला पाहिजे. कारण असे समोर आले आहे की, बंगळूरूमध्ये ई-टॉयलेटचा वापर करताना लोक आतून बंद झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ई-टॉयलेटबद्दल महापालिकेतर्फे आवश्यक आहे. कारण ई-टॉयलेटमध्ये सेंसर असल्यामुळे त्याचा दरवाजा बंद होईल आणि फ्लश होणार आहे.