Nagpur : 'महावितरण' आता ग्राहकांना देणार प्री-पेड स्मार्ट मीटर

Power
PowerTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : मोबाईल फोनप्रमाणेच (Mobile Phone) वीज ग्राहकही लवकरच त्यांचे वीज मीटर रिचार्ज करू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या (MSEDCL) नागपूर विभागात लवकरच 57 लाखांहून अधिक स्मार्ट प्रीपेड मीटर (Smart Prepaid Meter) बसवले जातील. महावितरणने त्यासाठी टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू केली आहे. रिचार्जची रक्कम संपल्यानंतर स्मार्ट मीटर आपोआप वीजपुरवठा खंडित करतील, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Power
NHAI: 'या' 4 जिल्ह्यांतील 122 गावांतील जमिनीला येणार सोन्याचा भाव

सोबतच महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले की, स्मार्ट मीटर केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि महावितरणच्या कोकण विभागात बसवले जातील. नागपूर विभागात विदर्भातील 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने यासाठी एकूण 15,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

यासाठी, महावितरणने Advanced Metering Infrastructure (AMI) सेवा पुरवठादारांच्या नियुक्तीसाठी टेंडर काढल्या आहेत. चालू वर्षात योजनेच्या पहिल्या टप्प्यात 15 टक्क्यांहून अधिक तांत्रिक आणि व्यावसायिक तोटा असलेल्या ग्राहकांसाठी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवले जातील. दुसऱ्या टप्प्यात ज्या भागात 15 टक्क्यांपेक्षा कमी वीज हानी आहे, तेथे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत.

Power
Nagpur : G-20चे विदेशी पाहुणे ठरले हिरो; नागपूरकरांच्या पदरात झिरो

देशभरात 'स्मार्ट मीटर नॅशनल प्रोग्राम' अंतर्गत स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. असे स्मार्ट मीटर आधीच परदेशात वापरात आहेत. मीटर मोबाईल ऍप्लिकेशनशी जोडले जाईल ज्यामुळे वापरकर्त्याला त्याचा वीज वापर ऑनलाइन तपासता येईल, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली.

यामुळे प्रलंबित वीज बिलांची प्रकरणे देखील कमी होतील. कारण रिचार्जची रक्कम संपल्यानंतर वीज आपोआप बंद होईल. महसूल वसुलीत वाढ आणि वीजचोरी प्रकरणांमध्ये घट होण्याचीही अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com