Nagpur: 'या' देखण्या प्रकल्पाचे राष्ट्रपतींकडून लोकार्पण

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : भारतीय विद्या भवनच्या रामायण सांस्कृतिक केंद्राच्या रूपाने नागपूर जिल्ह्याच्या नकाशावर अप्रतिम नवीन वास्तूची भर पडली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोराडी येथे एका समारंभात ही वास्तूचे लोकार्पण केले.

या कार्यक्रमाला पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार व महालक्ष्मी जगदंबा संस्थान चे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भवन्सचे कुलसचिव जगदीश लखानी उपस्थित होते.

Nagpur
Nashik : दोन योजनांसाठी 530 कोटी मंजूर; नाशिकसह मराठवाड्याला लाभ

कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिराच्या मागील बाजूस बांधलेल्या सांस्कृतिक केंद्राच्या सुशोभित गल्लीतून चालत गेल्यावर सुंदर रामायण संस्कृतिक केंद्र बनवले आहे. राष्ट्रपतींनी 'रामायण' तसेच भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि 'परमवीर चक्र' पुरस्कार विजेत्यांच्या चित्रणावर आनंद व्यक्त केला. सांस्कृतिक केंद्र हे भारताचे एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्मारक बनेल, सोबतच ते तरुण पिढीला भारतीय संस्कृती आणि तिची मूल्ये अवगत करेल आणि त्यांना प्रेरणाही देईल, असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू म्हणाल्या.

भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम वाढवणे आणि तरुण पिढीमध्ये आध्यात्मिक आणि देशभक्ती भावना जागृत करणे या उद्देशाने भारतीय विद्या भवनचे सांस्कृतिक केंद्र हे एक अनोखे प्रदर्शन संकुल आहे. सांस्कृतिक केंद्र हा पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्या भवन, नागपूर केंद्राने साकारलेला एक दूरदर्शी प्रकल्प आहे.

Nagpur
Good News: अखेर असा सुटला शिवाजीनगर रेल्वे भुयारीमार्गाचा तिढा?

रामायण सांस्कृतिक केंद्राची भव्य रचना 

रामायण सांस्कृतिक केंद्र हे 14,760 चौरस फूट परिसरात पसरलेले आहे. पहिल्या मजल्यावर, 'रामायण दर्शनम हॉल' म्हणून ओळखल्या जाणार्‍या, 'तुलसी रामायण' आणि 'वाल्मिकी रामायण' मधील महत्त्वपूर्ण भाग दर्शविणारी 120 सुंदर चित्रे आहेत. हे फलक श्रीरामाच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे जीवन दर्शवतात आणि मध्ये 'रामायण'चा प्रभावही ठळकपणे मांडतात.

भारत आणि परदेशातील सांस्कृतिक केंद्राची संपूर्ण रचना तयार करण्यात आली आहे. मंदिराच्या वास्तुकलेनुसार दुसऱ्या मजल्याला 'भारत माता सदनम' असे नाव देण्यात आले आहे. येथे भारत माता मंदिर सुद्धा बनवण्यात आले. त्यात भारत मातेचा कांस्य पुतळा बनविला आहे.

1857 ते 1947 पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या 115 चित्रांसह, 21 परमवीर पुरस्कारप्राप्त सैनिकांचे चित्र तयार करण्यात आले आहे. चेन्नईतील टी भास्करदोस यांनी आतील भाग कुशलतेने साकारला आहे, तर बाह्य शिल्प चेन्नई येथील डॉ. के दक्षिणामूर्ती यांनी साकारली आहेत.

सांस्कृतिक केंद्र कम प्लेक्सच्या वैभवात भर घालणारी वीर हनुमानाची 20 फूट ग्रॅनाइटची भव्य मूर्ती, दशा अवतार, अष्ट लक्ष्मी यांचे चित्रण करणारी दिव्य शिल्पे, गरुड आणि पाच हनुमानाचे तोंड असे सुंदर चित्रण या केंद्रात केले गेले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com