Nagpur : विधानसभेत सरकारची घोषणा; आश्रमशाळेतील शिक्षकांची 282 पदे लवकरच भरणार

Nagpur Vidhanbhavan
Nagpur VidhanbhavanTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण 977 आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी 225 कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी आतापर्यंत 180 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

या आश्रमशाळांमध्ये एकूण 2 लाख 23 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांतील शिक्षकांच्या 282 पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून, भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

Nagpur Vidhanbhavan
Chhagan Bhujbal : हिवाळी अधिवेशनातून आली नाशिक जिल्ह्यासाठी गुड न्यूज!

आश्रम शाळेतील रिक्त पदे कधी भरणार

ओबीसींना आधार योजनेचा लाभ कधी देणार, ओबीसी विद्यार्थ्यांची वसहतिगृहे कधी सुरू करणार, आश्रम शाळेतील रिक्त पदे कधी भरणार, या सर्व प्रश्नांचा भडीमार विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.

Nagpur Vidhanbhavan
Karjat CSMT via Panvel : पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुसाट; 'हा' आहे मुहूर्त

विधानसभेत विकास ठाकरे व इतर सदस्यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रिक्त पदे भरण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत मंत्री सावे म्हणाले की, आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरीत भरण्यात येतील. इतर मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी थेट लाभ देण्याच्या ‘आधार’ योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रतिजिल्ह्यात 600 अशा एकूण 21600 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता 50 वरून 75 इतकी वाढविण्यात आली असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही या अनुषंगाने चर्चेत सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com