Nagpur : डीपीसीतून जिल्हा परिषदेसाठी मिळणाऱ्या निधीला लागली कात्री

Nagpur ZP
Nagpur ZPTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून जिल्ह्याला भरघोस निधी मिळाला. परंतु जिल्हा परिषदच्या वाट्याला फारच थोडा निधी आला. मागील सात वर्षात सर्वाधिक कमी निधी यावर्षी देण्यात आला. 'क' वर्ग तिर्थक्षेत्राच्या निधीला कात्री लावत जन व नागरी सुविधांचा निधी ही निम्म्यावर आणण्यात आला. याचा थेट परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर होणार असल्याचे दिसते. 60 कोटीची मागणी केली होती परंतु 5 कोटी निधी डीपीसीतून देण्यात आला आहे.

Nagpur ZP
Mumbai : 'BKC'तील 3 हजार कोटींच्या भूखंडांसाठी टेंडर

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होतो. निधी कमी दिल्याने विकासावर परिणाम होणार आहे. हे ग्रामीण जनतेचे नुकसान आहे. त्यामुळे विकासात राजकारण न आणता पालकमंत्र्यांनी निधी वाढवून दिला पाहिजे. अशी मागणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत राऊत यांनी केली आहे. 2023- 24 साठी जिल्ह्याला डीपीसीतून 900 कोटींचा निधी मिळाला. यात 78 कोटी हा फक्त शहरी भागाच्या विकासासाठी आहे.

Nagpur ZP
Nagpur : 6 महिने झाले तरी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नाही निधी

मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास सव्वादोनशे कोटींचा निधी अधिकचा देण्यात आला. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री जिल्ह्याचा असण्याचा फायदा झाला. ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण (3054) लेखा शीर्ष अंतर्गत यावर्षी फक्त 5 कोटींचा निधी देण्यात आला. मागणी 60 कोटींची करण्यात आली होती. गेल्या वर्षी या लेखाशीर्ष अंतर्गत 37 कोटींचा निधी मिळाला होता. 'क' वर्ग तिर्थक्षेत्र विकासासाठी 13 कोटीची मागणी असताना फक्त 5 कोटी देण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत 4 कोटींचा निधी कमी देण्यात आला. जनसुविधेसाठी 47 कोटींची मागणी असताना फक्त 12 कोटी दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com