Nagpur : फडणवीस, गडकरींच्या नागपुरात चाललंय काय? 600 कुटुंबांचे घराबाहेर पडनेही का झाले मुश्किल?

Nitin Gadkari, Fadnavis
Nitin Gadkari, FadnavisTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), नागपूर महानगरपालिका (NMC) आणि वाडी नगरपालिकेने ऍटोमिक एनर्जी डेपो रोड वर राहणाऱ्या सुमारे 600 कुटुंबांची अक्षरक्ष: कोंडी केली आहे.

Nitin Gadkari, Fadnavis
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज! 'या' 7 प्रकल्पांमुळे निर्माण होणार तब्बल 20 हजार रोजगार

यात सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सिमेंट रोडचे काम सुरू केले आहे, तर दुसऱ्या कोपऱ्यावर नगरपालिकेने नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे ॲटॉमिक एनर्जी डेपो रोडवर स्थित निवासी संकुलात राहणाऱ्या किंवा जवळच्या आंबेडकर वस्तीत राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना आपल्या परिसरातून निघून शहरात इतरत्र जाण्यासाठी मार्गच उपलब्ध राहिलेला नाही.

नागपूर महानगरपालिकेने त्यात नागरिकांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. महानगरपालिकेने ऍटोमिक एनर्जी डेपो रोडच्या जवळ असलेल्या पॉप्युलर सोसायटी आणि कमला नगरमध्ये सिमेंट रस्त्यांचे काम व गट्टू लावण्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू केले आहे.

ॲटॉमिक एनर्जी डेपो रोडला मुकलेल्या शेकडो कुटुंबांना कमला नगर किंवा पॉप्युलर सोसायटीच्या मार्गाचा वापर करून बाहेर निघणे ही त्रासदायक झाले आहे. परिणामी, ॲटॉमिक एनर्जी डेपो रोडवर असलेल्या निवासी संकुल किंवा आंबेडकर वस्तीतील शेकडो नागरिकांना घरातून निघून वाडीच्या किंवा नागपूरच्या दिशेने जाणेही कठीण झाले आहे. 

Nitin Gadkari, Fadnavis
Devendra Fadnavis : मिशन मोडवर काम करा! देवेंद्र फडणवीसांनी कोणाला दिला आदेश?

कंत्राटदारची मनमानी

कहर म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसाठी सिमेंट रस्त्याचा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने खोदकामाचा मलबा तसाच ॲटॉमिक एनर्जी डेपो रोडच्या मधोमध आडवा टाकला आहे. त्यामुळे नागरिकांना पायी चालून महामार्गाच्या दिशेने जाणे ही कठीण होऊन बसले आहे.

दुसरीकडे, रस्त्यावर पावसात तुटलेले झाड गेले अनेक दिवस महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचललेले नाही. त्यामुळे झाडाच्या तुटलेल्या फांद्याही तशाच पडून आहे. परिणामी, लाईफस्टाईल सोसायटी लेखी सोसायटी आणि आंबेडकर नगर मधून निघून शाळेची बस पकडण्यासाठी महामार्गापर्यंत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, महिलांची मोठी अडचण झाली आहे. 

या परिसरातील आंबेडकर वस्तीकडील टोकावर ऐन पावसाळ्यात नगरपालिकेने पुलाच्या रुंदीकरणाचा काम काढले असून बेजबाबदार कंत्राटदाराने गेले अनेक दिवस हे काम बंद ठेवले आहे.  त्यामुळे तिथे प्रचंड चिखल झाले असून मोठ-मोठे खड्डे पडल्याने महिलांसह शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराचे रस्त्यावर पसरलेले बांधकाम साहित्य आणि इतर वस्तू इथल्या नागरिकांच्या अडचणी वाढवत आहेत.

Nitin Gadkari, Fadnavis
संभाजीनगरातील 'या' रस्त्यावर 4 वर्षांत एकही खड्डा कसा नाही? काय आहे 'येरेकर पॅटर्न'चे रहस्य?

या परिसरात ॲटॉमिक एनर्जी डेपो रोड वर बँक, व्यापारी संकुल, निवासी संकुल, रो हाऊसेस आणि आंबेडकर वस्ती वसलेली आहे. या मार्गाचा वापर पॉप्युलर सोसायटी आणि कमलानगरचे निवासी ही करतात. मात्र, गेले अनेक महिने ॲटॉमिक एनर्जी डेपो रोडची दुरावस्था होऊन मोठ मोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे. त्यामुळे या अनियोजित विकासकामामुळे नागरिकांची मात्र चांगलीच वाताहात होत आहे. 

नागरिकांनी खड्ड्यांची तक्रार करत नगरपालिकेकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली असता, खड्डे बुजवण्याच्या नावाखाली जाड गिट्टी आणून रस्त्यावर तशीच पसरवण्यात आली. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. 

ऐन पावसाळ्यात कोणतेही नियोजन न करता सुरू करण्यात आलेले काम, कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा, गेले अनेक महिने रस्त्याची झालेली दुरावस्था, मोठे मोठे खड्डे, शाळकरी मुलांची वाताहत या सर्व कारणांमुळे परिसरातील नागरिक मेटाकुटीला आले असून ते सध्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com