Mumbai : गुड न्यूज; 'ती' आली, 'ती' धावली अन् 'ती' जिंकली!

Double Decker E bus (File)
Double Decker E bus (File)Tendernama
Published on

मुंबई (Pune) : मुंबईकर प्रवाशांचे लक्ष लागून राहिलेली इलेक्ट्रिक डबल डेकर (Double Decker Bus) बस आजपासून (ता. १३) सेवेत दाखल होत आहे. बेस्टच्या कुलाबा (Collaba) आगारात या डबल डेकर बसच्या सेवेला सुरवात होणार आहे.

Double Decker E bus (File)
Pune: पुणे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांना रेल्वेचा दिलासा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बस बेस्टच्या ताफ्यात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दाखल झाल्या होत्या. बेस्टच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा समावेश होणार आहे.

Double Decker E bus (File)
Nashik : नमामी गोदा प्रकल्पात मोठी अपडेट; 'हे' काम सुरू

लंडन शहरामधील डबल डेकर बससारखाच या वाहनांचा लुक आहे. डबल डेकर बसला दोन जिने असून बसमध्ये चढणे आणि उतरणे प्रवाशांसाठी सोईचे होणार आहे. बसला मोठमोठ्या पारदर्शक काचा असल्याने मुंबईचे दर्शन करणे सोपे होणार आहे.

यात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. युरोपमधील इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या धर्तीवर या अत्याधुनिक बस असल्याने मुंबईकरांना या वाहनांतून प्रवासाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Double Decker E bus (File)
Pune : कोंडीने हडपसरकर वैतागले; का लागल्या वाहनांच्या रांगा?

नवीन डबल डेकर बस दक्षिण मुंबईतील काही मार्गांवरून धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर या बस धावणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सध्या तीन मार्गांवर बस धावणार असली, तरी टप्प्याटप्प्याने मार्गांमध्ये वाढ केली जाणार आहे. या बसचे किमान अंतरासाठी (म्हणजेच पाच किलोमीटर) भाडे हे सहा रुपये असणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com