मोदींचे नागपूरकरांना गिफ्ट; मेट्रोचा दुसरा टप्पा ५ हजार ९७६ कोटीचा

Narendra Modi
Narendra ModiTendernama
Published on

नागपूर (Nagpur) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रस्तावित ११ डिसेंबरच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी मेट्रो टप्पा २ प्रकल्प व नागनदी संवर्धन, सौंदर्यीकरणासाठी निधी देत नागपूरकरांना गिफ्ट दिले आहे.
शहराला ग्रामीण भागाशी जोडणारा महत्वाकांक्षी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे आता कन्हान, बुटीबोरी, कापसी, हिंगण्यापर्यंत मेट्रोचा मार्ग मोकळा झाला. मागील वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकल्पासाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती.

Narendra Modi
अखेर राज्यात गुंतवणूक आली! 'या' कंपनीची महाराष्ट्राला पसंती

नागपूरची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवश्यकतेचा विचार करून शहरातील मेट्रो वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील ४८.२९ किलोमीटरच्या मार्गास बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली. राज्य सरकारने २०१९ मध्ये या प्रकल्पासाठी ११ हजार २३९ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता दिली आहे. आता केंद्राच्या मंजुरीनंतर मिहान ते एमआयडीसी इएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्यनगर ते हिंगणा, प्रजापतीनगर ते कापसीपर्यंत मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रोचा दुसरा टप्पा ४३.८ किमीचा असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची एकूण लांबी ८२ किमी असेल. शहर व ग्रामीण भागाला जोडण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून १० लाखांवर नागरिकांना या टप्प्याचा फायदा होणार आहे.

Narendra Modi
नाशिकमध्ये शंभर एकरावर आयटीपार्क, डाटा सेंटर : उदय सामंत

कामठीपर्यंत सहज नागरिकांना जाता येणार आहे. कामठी मोठे शहर असून हजारो रहिवासी नोकरी आणि शिक्षणासाठी नागपूरला येतात. ते मेट्रोचा वापर करून नागपूरच्या कानाकोपऱ्यात जलद पोहोचू शकणार आहे. बुटीबोरी एमआयडीसी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथे सुमारे ७५० युनिट्स असून सुमारे ५०,००० लोकांना रोजगार मिळत आहे. या नागरिकांना कारखान्यांपर्यंत जलद प्रवासाची सुविधा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com