यशोमती ठाकूर यांनी असे काय केले की, सरकारने 'या' योजनेसाठी दिले कोट्यवधी

Yashomati Thakur
Yashomati ThakurTendernama
Published on

अमरावती (Amravati) : तिवसा नगरपंचायत पाणीपुरवठा प्रकल्पाला राज्य सरकारने 27.91 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी हा प्रश्न लावून धरला होता. तसेच नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्येही त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तरीही सरकारकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

Yashomati Thakur
Nagpur : नागपूरकरांना मिळणार जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन 11 मजली इमारत; टेंडरही निघाले

अखेर शुक्रवारी शासनाने पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर केला असून, यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. तिवसा नगरपंचायतीतील पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या पाण्यासाठी हाल होत असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न झाल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आमदार यशोमती ठाकूर यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच याबाबत सरकारला जाग येत नसल्याने विविध आंदोलने ही केली. शहराचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 28.99 कोटी रुपयांचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरी घेऊन पुढील कारवाई व प्रशासकीय मान्यता मिळावी, याबाबत मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित होता. त्यामुळे ठाकूर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारादेखील दिला होता. 

Yashomati Thakur
Nagpur : महापालिकेला मिळणार का 87 कोटींचा निधी? अजून पहिलेच प्रस्ताव...

या इशाऱ्यानंतर अखेरीस सरकारने या योजनेसाठी 27 कोटी 91 लाख मंजूर केले असून, याबाबतचा कार्यादेश 18 महिन्यांसाठी असणार आहे. 18 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना आदेशाद्वारे देण्यात आले आहेत. राज्य शासनातर्फे प्रकल्पासाठी 95 टक्के म्हणजे 26 कोटी 51 लाख अनुदान देण्यात येणार असून, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजेच तिवसा नगरपंचायतीचा 5 टक्के म्हणजे 1 कोटी 39  लाख रुपये सहभाग असणार आहे. तिवसा पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने निधी मंजूर केल्याबद्दल अॅड. ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला असून, आता तिवसेकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com