दीक्षाभूमीचा लवकरच चेहरामोहरा बदलणार; 58 कोटींचे विकासकार्य होणार सुरु

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

चंद्रपूर (Chandrapur) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने इतिहास घडविलेल्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या सर्वसमावेशक विकासासाठी 56 कोटी 20 लाखांच्या आराखड्याला सामाजिक न्याय विभागाची अंतिम मंजूरी प्रदान केली आहे.

Eknath Shinde
Nagpur : विदर्भातील रस्त्यांची का लागली वाट? दुरुस्तीही थांबली, जबाबदार कोण?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर व चंद्रपुरात बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला. मात्र, चंद्रपूर दीक्षाभूमी अविकसित आहे. देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी सोयीसुविधा नाहीत. परिणामी येथे गैरसोय होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी पहिल्या हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित 100 कोटींचा निधी देण्याची मागणी केली होती. दीक्षाभूमी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. सत्ता परिवर्तनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. मागणीची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात घोषणा केली होती. राज्य शासनाने निधी मंजूर केल्याने ऐतिहासिक दीक्षाभूमीचा कायापालट होणार आहे.

Eknath Shinde
Nagpur : नागपुरातील 'या' उड्डाणपुलामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार का?

अशी केली जातील कामे :

मंजूर निधीतून 65 फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. त्यांच्या जीवनावर आधारित भित्तिचित्रे, सुरक्षा भिंत, बुद्धविहार, परिसर सौंदर्गीकरण, वाहनतळ व्यवस्था, सभामंडप यासह इतर अनुषंगिक कामे केली जाणार आहेत.

उच्चाधिकार समितीनेही दिली मान्यता : 

दीक्षाभूमी विकासासाठी उच्चाधिकार समितीने 56 कोटी 90 लाखांचा प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर झाला होता. समितीने मंत्री देऊन वित्त व नियोजन विभागाकडे प्रस्ताव पाठविला, नियोजन विभागानंतर सामाजिक न्याय विभागानेही अंतिम मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. अशी माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com