नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असल्याने १२० कोटी रोखले?

Nagpur ZP
Nagpur ZPTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्हा परिषदेचा १२० कोटी रुपयांचा निधी रोखण्यात आल्याने मोठा असंतोष उफाळून आला आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असल्याने त्यांच्या सदस्यांनी थेट उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप करणे सुरू केले आहे. त्यास भाजपच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला जात असल्याने जिल्हा परिषदेच्या आमसभेत मोठी शाब्दिक चकमक उडाली.

Nagpur ZP
EXCLUSIVE : 'CMO'तून 'VIP' फाईल्स, पत्रांना फुटले पाय!

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचा निधी रोखण्याता आदेश दिल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी केला. त्यावर विरोधी पक्ष नेते आतिश उमरे यांनी आक्षेप घेतला. शासनाने स्थगिती उठवली आहे. पालकमंत्र्यांनी निधी न देण्याचा दिलेला आदेश दाखवा, असे उमरे म्हणाले. संजय झाडे यांनीही आदेश दाखविण्याची मागणी केली. बर्वे व उमरे यांच्यात खडाजंगी सुरू असताना प्रकाश खापरे व दुधाराम सव्वालाखे यांनी सर्व कामांवरील स्थगिती उठवली का, असा सवाल केला.

Nagpur ZP
'वंदे भारत'ला गुरांची धडक बसत असल्याने रेल्वेकडून कुंपणासाठी टेंडर

दरम्यान सुभाष गुजरकर यांनी बर्वेंच्या वक्तव्याला विरोध दर्शविला. आदेश दाखवा नाही तर माफी मागा, अशी मागणी केली. त्यानंतर विरोधकांनी बर्वेनी सभागृहाची माफी मागण्याची मागणी केली. दोन्ही बाजुचे सदस्य एकमेकांसमोर आले. त्यामुळे या मुद्यवार १० ते १५ मिनिट गोंधळ चालला. स्थगितीमुळे ग्रामीण भागातील विकास कामे रखडली असून स्थगिती उठवण्यासाठी शासनाकडे पत्र व्यवहार केल्याचे बर्वे यांनी सांगितले. स्थगिती उठली पाहिजे, अशा घोषणाही सत्ताधाऱ्यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com