Nagpur : 389 एकरात बनणार नरखेड एमआयडीसी फेज-2; येणार अनेक मोठे उद्योग

Narkhed MIDC
Narkhed MIDCTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील वडेगाव उमरी येथे 389 एकरात नरखेड एमआयडीसी फेज-2 ला हायपॉवर कमेटीची मंजूरी मिळाली आहे. येथे नव्या उद्योगांची पायाभरणी होणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा परिषद सदस्य तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार गट) नेता सलिल देशमुख यांनी दिली.

Narkhed MIDC
Nagpur : 'एम्स'च्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी मिळेल 50 एकर जागा?

नरखेड येथील एमआयडीसीमध्ये जागा नसल्याने काही उद्योग येवू शकत नाही. यामुळे येथे नवीन एमआयडीसीची मागणी होत होती. यासाठीचा प्रस्ताव तयार करुन राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या हाय पॉवर कमेटीमध्ये नरखेड येथील एमआयडीसी फेज 2 ला मान्यता देण्यात आली असून जवळपास 154.44 हेक्टर जमीन (400 एकर) खरेदी करण्यात येणार आहे.

हे उद्योगपति सुरु करू शकतात मोठे उद्योग : 

नरखेड येथील एमआयडीसी मध्ये 20.59 हेक्टर जमीन आहे. परंतु ही सर्व जमीन वितरीत करण्यात आली आहे. नरखेड आणि परिसरात नविन उद्योग यावे यासाठी सलील देशमुख यांनी गेट वे फोरमच्या माध्यमातुन काही उद्योजकांची भेट घेतली. त्यांनी नरखेड येथे उद्योग सुरु करण्यासाठी सकारात्मक उत्तर दिले. रेमंड चे गौतम सिंघानिया, डी डेकोर होम फैब्रिक्स चे अजय अरोरा, इंडोनेशिया चे कॉन्सलेट जर्नल, टेस्ला, फॉसकॉन सारख्या मोठ्या कंपन्यांच्या सीईओ सोबत सकारात्मक चर्चा झाल्याची सलिल देशमुख यांनी सांगितले. 

Narkhed MIDC
Nagpur : औद्योगिक क्षेत्राच्या गौरवात भर; होरीबा कंपनीच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे नवी ओळख

हे मोठे उद्योग सुरु होण्याची शक्यता :

सलील देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे वडेगाव उमरी येथील नरखेड एमआयडीसी फेज 2 साठी 400 एकर जमीन मंजूर करण्यात आली आहे. खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी आमदार अनिल देशमुख यांनी अनेक अधिवेशात हा मुद्दा लावुन धरला होता. काटोल-नरखेड औद्योगिक क्षेत्र विविध नैसर्गिकरित्या मिळवलेल्या खनिजांनी समृद्ध आहे, आणि टेक्सटाइल उद्योग, केमिकल इंडस्ट्रीज, प्रोडक्ट असेंबलिंग इंडस्ट्रीज, बायो टेक्निकल इंडस्ट्रीज, मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज या उद्योगांसाठी उपयुक्त आहे. हे मोठे उद्योग आले तर त्यांना एमआयडीसी अंतर्गत विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.

पायभूत सुविधा उपलब्ध : 

नागपूर ते काटोल 4 लेन रस्त्याचे काम सुरु आहे. सर्व प्रमुख स्थानकांसाठी ट्रेन कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. सर्व महत्त्वाच्या शहरांसाठी बस सेवा उपलब्ध आहे. भोपाळ, पांढुर्णा, बैतुल, छिंदवाडा आणि इतर प्रमुख औद्योगिक क्षेत्रांसारख्या शहरात जाण्यासाठी साधन उपलब्ध आहे. कनेक्टिविटी आणि ट्रांसपोर्ट ची सुविधा उपलब्ध आहे. या परिसरात कापूस, सोयाबीन, संत्री ही प्रमुख पिके घेतली जातात. म्हणून शेतकऱ्यांना नरखेड एमआयडीसी फेज 2 चा फायदा होणार. विशेष म्हणजे वर्धा आणि जाम या दोन प्रमुख नद्या या परिसरात आहे. तसेच 220 केव्हीए वीज उपलब्ध होईल.

Narkhed MIDC
Mumbai : 'त्या' महापालिकेने मंजूर केलेले 44 बांधकाम प्रकल्प रद्द करावेत; चौकशीचीही मागणी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना आमदार अनिल देशमुख यांनी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत बैठक घेवून प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली होती. यानंतर हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले. प्रस्ताव तयार करण्यासाठी सलील देशमुख यांनी नागपूरपासून तर मुंबईत मंत्रालयापर्यत सातत्याने पाठपुरावा केला.  

राज्य शासनाने मंजुरी द्यावी : 

हायपॉवर कमेटीने नरखेड एमआयडीसी फेज 2 ला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकराने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष जमीन खरेदीला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने याला लवकरात लवकर मंजुरी देण्यासाठी या भागाचे आमदार अनिल देशमुख हे सध्या मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तर मुद्दा उचलतील, पण राज्य सरकारची मंजुरी मिळण्यासाठी माझा सातत्यपुर्ण पाठपुरावा हा सुरुच राहणार असल्याचेही सलील देशमुख यांनी माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com