LED Lights : 500 पेक्षा अधिक पथदिवे पडले बंद; कोट्यवधींच्या कंत्राटाचे 'वाजले की बारा'

Street Lights
Street LightsTendernama
Published on

यवतमाळ (Yavatmal) : वणी येथील नगरपरिषेदतर्फे शहरातील जुने पथदिवे काढून नवीन एलईडी पथदिवे (LED Street Lights) बसविण्यासाठी पाच वर्षांपासून सुमारे चार कोटी रुपयांचे कंत्राट (Contract) देण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत 5 हजार 826 एलईडी पथदिवे लावण्यात आले. मात्र, बहुतेक एलईडी निकृष्ट निघाले असून, वारंवार दिवे बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहेत. पथदिवे बंद होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, एलईडीचा झगमगाट वणी शहरातून गायब झाल्याचे चित्र आहे.

Street Lights
Nagpur : नागपूर शहरापासून 80 किमीवर उभे राहतेय एक नवे आश्चर्य! लवकरच उद्घाटन

ऐन पावसाळ्याच्या दिवसांत वणी शहर अंधारात गेले आहे. यामुळे माजी नगरसेवकांकडून वीज विभागावर आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर एक कोटी 58 लाख रुपयांचे बिल थकल्याने ठेकेदार काम करीत  नसल्याचे कारण प्रशासनाने पुढे केले आहे. नगरपरिषदेतर्फे 27 जून 2018 रोजी नवीन एलईडी लाइट लावणे व त्याची देखभाल करणे या कामाचे‍ कंत्राट सात वर्षांसाठी एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. ठेकेदाराला आतापर्यंत 6 लाख 33 हजार रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे.

शहरातील 1 ते 8 प्रभागांमध्ये 5 हजार 826 नवीन एलईडी लाइट बसविण्यात आले आहेत. 3, 7, 9, 12, 15 मीटर रुंद असणाऱ्या रस्त्यांवर गरजेनुसार 26 ते 150 वॉट क्षमतेचे - पथदिवे बसविले आहेत. देखभाल दुरुस्तीचे कामही ठेकेदाराकडे आहे. शहरातील अनेक भागांतील एलईडी दिवे बंद असल्याची तक्रार माजी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.

Street Lights
Nagpur : 'या' प्रकरणी डब्ल्यूसीएलच्या दोन अधिकाऱ्यांना कारावास

पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पथदिवे देखभाल व दुरस्तीसाठी शहरात कमीत कमी पाच कर्मचारी आवश्यक असताना केवळ एका कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोडून ठेकेदार वणीकर नागरिकांना वेठीस धरत आहे आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी याबाबत काही बोलायला तयार नाहीत.

पालिकेकडून बसविण्यात आलेले पथदिवे वारंवार बंद पडण्याचे प्रमाण मागील सहा महिन्यांपासून वाढले आहे. नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या. याबाबत नपला सूचना केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. परंतु प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप माजी नगरसेवक राकेश बुग्गेवार यांनी केला आहे.

Street Lights
शिंदे सरकार दोषी तहसिलदाराला का पाठिशी घालतेय?

आठ दिवसांत ठोस निर्णय होईल : मुख्याधिकारी

राज्य सरकारने ईईएसएससोबत हा करार केला आहे. त्यामुळे सर्व नगरपालिकांना हा करार करणे बंधकारक होते. बहुतांश पालिकेत वणीसारखीच परिस्थिती आहे. राज्य सरकारचा तो करार असल्याने नगरपालिका स्वतःहून दुसरे टेंडर काढू शकत नाही. मी वणीला आलो तेव्हापासून हा विषय पेंडिंग आहे. आठ दिवसांत याबाबतीत काही तरी ठोस निर्णय घेण्यात येईल, असे वणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com