Amravati : अचलपुरातील 'हा' प्रकल्प मूळ उद्दिष्टांपासून आताही भरकटला?

Dam
DamTendernama
Published on

अमरावती (Amravati) : परतवाडा-अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्प सिंचनाच्या मूळ उद्दिष्टांपासून भरकटला आहे. सपन प्रकल्पाची सिंचन क्षमता 6380 हेक्टर असून अचलपूरातील 33 व चांदूर बाजार तालुक्यातील दोन गावांना सिंचनाचा लाभ यात अपेक्षित आहे. प्रकल्पात 2010-11 पासून पाणी अडविले जात आहे. या प्रकल्पातून जून 2007 नंतर 1974 हेक्टर, जून 2008 नंतर 2146 हेक्टर आणि 2009 अखेर अतिरिक्त पूर्ण सिंचन क्षमता निर्माण करण्याचे प्रस्तावित होते पण, प्रकल्पावर आजही पूर्ण क्षमतेने सिंचन झालेले नाही.

Dam
Mumbai : नाल्यात टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

सिंचनाकरिता आवश्यक वितरिका व लघु कालव्याची कामे 17 वर्षांपासून प्रलंबित आहेत. जी थोडीबहुत झाली आहेत, तीही तांत्रिकदृष्ट्या योग्य नाहीत, ती शेतकऱ्यांच्या रोतीची पिकाची नासाडी करणारी ठरली आहेत. सपन प्रकल्पाचे काम 16 नोव्हेंबर 2000 ला सुरू झाले. तेव्हापासून आजपर्यंत या प्रकल्पाच्या वाढीव खर्चास चार वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता 495.29 कोटी रुपयांची आहे. यातही 35 गावांमधील 6134 हेक्टर क्षेत्राला सिंधनाचा लाभ मिळणार असल्याचे नमूद आहे. पण आज या प्रकल्पावर केवळ 1600 हेक्टर सिंचन होत असल्याची माहिती आहे. यातही शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील होणारे सिंचन गृहीत धरण्यात आले आहे. सिंचनादरम्यान 350 किलोवॅट विद्युत निर्मितीकरिता एक संघ प्रस्तावित केला गेला. विद्युत विमोचकाचे कामही या अंतर्गत केले गेले. परंतु या प्रकल्पावर एकदाही वीज निर्मिती केल्या गेलेली नाही. सिंचनाकरिता निर्मित या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. प्रकल्पाला सिंचनाचे उद्दिष्ट गाठता न आल्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याकरिता या प्रकल्पाची निर्मिती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Dam
Mumbai Metro-1च्या व्यवहारात रिलायन्स इन्फ्राची अडीच हजार कोटींची चांदी; जॉनी जोसेफ अहवालात लपलेय काय?

कॅनलची कामे अर्धवट : 

कॅनलची साफसफाई नाही. हे कॅनल रायमुनिया आणि झाडाझुडपांनी व्यापले गेले आहेत. कॅनलमध्ये चक्क झुडपी जंगल उभे ठाकले आहे. सालेपूरवरून जाणारा खरपी कॅनल अर्धवट पडलेला आहे. त्याचे कामच पूर्णत्वास नेलेले नाही. पुलाच्या भिंती उभ्या आहेत, पण त्यावर स्लैपच टाकला गेलेला नाही. या ठिकाणी अपघाताची मालिका सुरू असून अनेकांचे जीव गेले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com