Nagpur : पारडी येथे बनणार देशातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : पोलिस चोवीस तास राबतात, त्यांना राहण्यासाठी चांगली घरे मिळाली पाहिजे, या दृष्टीने पोलिस हाऊसिंग विभागाला दोन हजार कोटी उपलब्ध करून दिले. कामाचा वेग संथ असून अशाप्रकारे कामे झाली तर पुढील अनेक वर्षे निघून जातील, अशी नाराजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्मार्ट पोलिस स्टेशनच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली. या विभागातील झारीतील शुक्राचाऱ्यांवर उपाययोजना करा, अशा सूचना त्यांनी विभागाच्या प्रमुखांना दिल्या.

Nagpur
Nagpur: पोलिस मुख्यालयाचे 3 प्रस्ताव PWD ने का रोखले?

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या पारडी येथील पोलीस स्टेशनचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी आभासी पद्धतीने भूमिपूजन झाले. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत क्षेत्राधिष्ठीत विकास या घटकाखाली मौजा पारडी, भरतवाडा, पूनापूर व भांडेवाडी क्र. 1, येथील 1730 एकर क्षेत्राकरिता प्रारुप व प्राथमिक नगर रचना परियोजना शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे. शासनामार्फत मंजूर प्राथमिक नगर रचना परियोजने अंतर्गत मौजा पुनापूर : मधील नगर भूमापन क्रमांक 150 (पै.), 173 (पै.) व मौजा भांडेवाडी मधील नगर भूमापन क्रमांक 237 (पै.) या भूखंडावर, अंतिम भूखंड क्र. 310 पोलीस स्टेशन / फायर स्टेशन' हे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. लोकहितार्थ उक्त आरक्षणाखालील 17,087 चौ. मी. (4.22 एकर) जमिनीचा ताबा जमीन मालकांमार्फत नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमीटेड (NSSCDCL), नागपूर यांना विनामोबदला दिल्याबद्दल आभारपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रसन्न दिलीप ढोक, विनय श्यामसुंदर सारडा व इतर आणि अनिलकुमार रामप्रताप सारडा व इतर यांना देण्यात आले. तसेच प्रकल्पाचे कंत्राटदार देवेन पाडगल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Nagpur
Mumbai: मुंबईतील मोकळ्या जागा वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

सदर प्रकल्प 12,160 वर्ग मीटर मध्ये तयार होणार असून त्याला तळमजला व त्यावर 2 मजले राहतील. प्रकल्पासाठी एकूण 9,33,58,820 रुपये निधी प्रस्तावित आहे. याप्रसंगी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, मोहन मते, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ संदीप बिष्णोई, नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com