खुद्द फडणवीसांच्या जिल्ह्यातच 'रात्रीस खेळ चाले..!'

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूर जिल्ह्यातच (Nagpur District) अवैध उत्खनन सुरू आहे. मौदा तालुक्यातील कोंदामेंढी येथे बिनधास्तपणे रात्रीस गौण खनिजाचा (मुरूम) उपसा केला जात आहे. याबाबत महसूल, पोलिस, वाहतूक, खनिकर्म आणि पर्यावरण विभाग कोणीही कारवाई करीत नसल्याने चोरीचा मामला गुपचूप राहा, असा प्रकार सुरू आहे.

Devendra Fadnavis
निफाड साखर कारखाना चालविण्याचे 25 वर्षांचे टेंडर 'या' कंपनीकडे

या परिसरात आठवडाभरापासून  मुरुमाचे रात्रीला उत्खन आणि वाहतुकीचा जोरात सपाटा सुरू आहे. याबाबत कसल्याही प्रकारची महसूल विभागाकडे नोंद नाही. गौण खनिजाच्या चोरीवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारगाव रीठी येथे महसूल आणि पोलिस विभागाचे गौण खनिज वाहतूक तपासणी नाका चौकी उभारली आहे. मात्र ती देखील शोभेची ठरत आहे. जेसीबीद्वारे मुरूमाचे उत्खन सुरू असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक केल्या जात आहे. रात्रभऱ्यात पाचशे ते सहाशे ब्रास मुरूमाची चोरी केल्या जात आहे. यात शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून पर्यावरणाचे नुकसान होत आहे. त्याबरोबरच रस्त्याची चाळण होत असल्याने अपघाताला निमंत्रण देण्याइतपत रस्त्याची अवस्था होतेय. जनतेच्या नजरेत छाव बनण्यासाठी हेच नेते रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका बजावितात.

Devendra Fadnavis
BKCतील 'त्या' भूखंडांना प्रति चौमी ३ लाख ४४ हजारांचा दर; MMRDAच्या

रात्रभऱ्यात पाचशे ते सहाशे ब्रास मुरूमाची चोरी केल्या जात आहे. यात शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून पर्यावरणाचे नुकसान होत आहे. त्याबरोबरच रस्त्याची चाळण होत असल्याने अपघाताला निमंत्रण देण्याइतपत रस्त्याची अवस्था होतेय. जनतेच्या नजरेत छाव बनण्यासाठी हेच नेते रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका बजावितात.

Devendra Fadnavis
नागपूर रेल्वे स्थानकाचे टेंडर अंतिम टप्प्यात; ३५० कोटींच्या कामाला

चोरीच्या मुरूमाचे भाव आकाशाला भिडले
घराच्या बांधकामासाठी रस्त्याची मळणी आणि दुतर्फा टाकण्यासाठी तसेच पांदण रस्त्यावर मळणी करण्यासाठी याबरोबरच भरण भरण्यासाठी मुरूमाचा वापर केला जातो. चारशे ते पाचशे रुपयाला एक ट्रॉली मुरूम मिळायचा. मात्र आता त्याच मुरूमाचा भाव हजार ते बाराशे रुपये झाले. माफियाकडून चोरी केलेल्या मुरूमाला देखील चांगला भाव मिळत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आले आहे. महसूल, पोलिस आणि वेळेवर आलेल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिरीमिरी करून वाटप करावे लागत असल्याने देखील मुरूमाचे भाव वाढले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com