Nagpur : दीड वर्षात पूर्ण होणार का वर्ल्ड क्लास स्टेशनचे काम?

Nagpur Railway Station
Nagpur Railway StationTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : डिसेंबर 2025 पर्यंत नागपूरचे मुख्य रेल्वेस्टेशन आणि मे 2026 पर्यंत अजनीचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनेल. त्यासंबंधाने आवश्यक ते नियोजन झाले आहे. सोबतच नागपूर रेल्वे स्टेशनच्या नवीनीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे भूमि विकास प्राधिकरण, महाराष्ट्रतर्फे कायापलटाचे काम जलदगतीने केले जात आहे. विभागाने सर्व पूर्वतयारी कामे पूर्ण केल्यानंतर आणि सध्याच्या उपयोगी सेवा या ठिकाणी स्थलांतरित केल्यानंतर, स्टेशनच्या पूर्वेकडील तसेच पश्चिम सेक्टरवर आराखड्यानुसार बांधकाम पूर्ण केली जात आहेत.

Nagpur Railway Station
Nagpur News : नागपुरातील वाहतूक कोंडी फूटणार का? 164 कोटींच्या टेंडरसाठी 'या' 2 कंपन्यांत स्पर्धा

डिसेंबर 2025 मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानंतर मोठा बदल दिसून येईल. पुनर्विकसित नागपूर रेल्वे स्टेशनची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की तेथे दररोज 98,000 प्रवासी बसू शकतील. आणि प्रवाश्यांना कोणताही त्रास नाही होणार याची ही काळजी घेतली जात आहे.

स्टेशनवर येण्या-जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी पुलाची व्यवस्था : 

येण्या-जाण्यासाठी प्रवाश्यासाठी ओव्हरब्रिज (एफओबी) बांधण्यात येणार आहे. हे क्षेत्र 108 मीटर रुंद असेल, ज्यामध्ये सर्व प्रवासी सुविधा आणि रिटेल पर्यायांचा समावेश असेल. पश्चिमेकडील स्थानकावर दोन मजल्यांचा प्रस्थान आणि आगमन प्लाझा असेल, ज्यामध्ये तळघर आणि पृष्ठभाग पार्किंग क्षेत्र 3,420 चौ.मी. टॅक्सी, कार आणि ऑटोसाठी लेन असतील, ज्यामध्ये ड्रॉप ऑफ आणि पिकअप सुविधांसह सहज मार्ग उपलब्ध केले जाणार आहे.

Nagpur Railway Station
Mumbai Goa Highway News : यंदाच्या गणेशोत्सवातही मुंबई-गोवा महामार्गाची रडकथा कायम; आता डिसेंबरचा मुहूर्त

असे सुरू आहे बांधकाम : 

पूर्वेकडील आगमन इमारतीत 5 मजले असतील. तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या मजल्याच्या  भवनाचे बांधकाम सुरू आहे. तात्पुरते नवीन बुकिंग काउंटर स्थलांतरासाठी तयार आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फलाट 8 वर दक्षिण एफओबीपासून नवीन ठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था केली गेली आहे. सोबतच बुकिंग काउंटर स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पश्चिम बाजूस बनणार सात मजली इमारत : 

पश्चिम बाजूस रेल्वे प्रशासनाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, तेथे 7 मजले बांधण्यात येणार आहेत. सध्याची सुविधा येथे स्थलांतरित करण्याची योजना आहे. त्याच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. दीर्घकाळ टीकण्यासाठी  स्टील संमिश्र इमारत बांधण्याची योजना आहे. जुन्या कार पार्किंगची जागा मोकळी करण्यात आली आहे. पार्किंगची सुविधा स्थलांतरित करण्यात आली आहे. स्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवाशांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तळघर बांधकामाचे नियोजन व अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे. तळघराचे 50 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित जागेचे काम ऑगस्ट 2024 अखेर सुरू होईल. FOB साठी प्लॅटफॉर्मचे काम लवकरच सुरू होईल कारण त्याचे स्टीलचे काम वर्कशॉपमध्ये सुरू आहे. नागपूर स्टेशन खर्चाची रक्कम 487.77 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीपासून नवसंजीवनी सुरू झाली आहे. आतापर्यंत अनेक कामे पूर्ण झाली आहेत. माती परीक्षण पूर्ण झाले असून साइट लॅब सुरू झाली. बॅचिंग प्लांट स्थपित करून सुरू करण्यात आला आहे. पूर्व दिशेला युटिलिटी शिफ्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक वळवण्यासाठी मिल्क साइडिंग, पार्किंग एरिया, नवीन प्रवेश/निर्गमन पूर्ण झाले आहे. व्हील वॉशिंग युनिट पूर्ण झाले आहे. आणि डीसंबर 2025 पर्यंत उर्वारित काम पूर्ण केले जातील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com