हे काय? टेंडर प्रसिद्ध होऊन पाच महिने उलटले तरी लिफाफा बंदच

Chandrapur
ChandrapurTendernama
Published on

चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने सुमारे 4,800 लाख रुपयांच्या जलसंधारणाच्या विविध कामांच्या टेंडर प्रकाशित करण्यात आल्या. यानुसार टेंडरही प्राप्त झाले. मात्र, तब्बल पाच महिने लोटूनही या टेंडर बंद लिफाफ्यातच पडल्या असल्याची धक्कादायक माहिती आहे.

Chandrapur
Mumbai Metro 3 : मेट्रोच्या भुयारी प्रवासातही अनुभवता येणार वेगवान इंटरनेट अन् मोबाईल सेवेचा थरार

उन्हाळ्यात ही कामे होणे अपेक्षित आहे. टेंडरच उघडण्यात न आल्याने जलसंधारणाच्या कामांना खोळंबा बसला आहे. काही टेंडर उघडून वर्क ऑर्डर झाली. परंतु ती कामेही अद्याप सुरू झाली नसल्याची माहिती आहे. यामध्ये बहुतांश कामे नाले, नदी व गेटेड साठवण बंधाऱ्यांची आहेत. 27 नोव्हेंबर 2023 रोजी या टेंडर प्रकाशित करण्यात आले होते. आजघडीला त्या उघडण्यातच आलेल्या नाहीत. मूल तालुक्यातील रत्नापूर 652.11 लाख, सुशिदाबगाव 698.31 लाख, आकापूर-737.95, ताडाळा 808.56 लाख, चितेगाव- 732.51 लाख व बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-187.67 लाख, पळसगाव -183.60 लाख रुपयांची कामे अडली आहेत.

Chandrapur
Nagpur : आदिवासींना आता शहरी भागातही मिळणार घरकुल; अनेक वर्षांची मागणी अखेर मान्य

टेंडर प्रकाशित झाल्यानंतर तीन महिन्यांत त्या उघडून त्या कामांची वर्क ऑर्डर होणे गरजेचे आहे. परंतु प्रकाशित निविदांना तब्बल पाच महिने लोटलेले आहेत. आगामी काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. यामुळे ही कामे अडण्याची शक्यता बळावली आहे. मूल तालुक्यातील चिखली आणि मोरवाही येथील कामांचे वर्क ऑर्डर झाले परंतु ही कामे सुरूच झाली नसल्याचीही ओरड आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागणार हे विशेष. संबंधित कामांचे टेक्निकल इव्हॅल्युएशन करून तसा प्रस्ताव नागपूर येथील प्रादेशिक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठविला आहे. अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, चंद्रपूर नीलिमा मंडपे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com