नागपूर (Nagpur) : नागपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, लोकसंख्या वाढत आहे. सध्याच्या आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे नागपूर सुधार ट्रस्टने (NIT) वाठोडा येथे 345 खाटांचे नवीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मौजा वाठोडा खसरा क्रमांक 157 येथील रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला नागपूर सुधार न्यासाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
187.71 कोटींचा प्रकल्प...
2007 मध्ये आमदार मोहन मते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एनआयटीच्या जमिनीवर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी निवेदन दिले होते. त्यास मान्यता दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी एनआयटीला डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या. एनआयटीने डीपीआर तयार केला असून, त्यात वाठोडा खसरा क्रमांक 157 येथील रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
या रुग्णालयाच्या प्रकल्पाची किंमत 187.71 कोटी आहे. गरिबांना उपचार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने पालिका क्षेत्रातील मुलभूत सुविधा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.
सोमलवाडात रोगनिदान केंद्र
एनआयटीच्या बैठकीत मौजा सोमलवाडा येथे गोवर निदान केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव गरिबांना रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि हॉस्पिटलच्या अक्सिलरी सुविधा कमी खर्चात मिळाव्यात, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. एजन्सी नेमण्याचे अधिकार एनआयटीच्या अध्यक्षांना देण्यात आले.