Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील 'या' रस्त्यांसाठी साडे नऊ कोटींचा निधी

Road
RoadTendernama
Published on

Gondia News गोंदिया : आदिवासी क्षेत्रातील अनेक वर्षांपासूनची रास्त्याची समस्या आता दूर होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी सरकराने 9.50 कोटींचा निधी मंजूर केला असून, या निधीतून सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व सालेकसा या आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

Road
Sambhajinagar : आमदार पावले! सातारा-देवळाई रस्त्यासाठी मिळाला कंत्राटदार

सरकारने जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व सालेकसा या आदिवासी बहुल क्षेत्रातील रस्ते विकास कामांसाठी 9.50 कोटींचा निधी प्राप्त केली जाणार आहेत. खा. प्रफुल पटेल यांनी यासाठी पाठपुरावा केल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली.

या निधीतून रस्ता दर्जोन्नतीची कामे करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या दोन तालुक्यात जवळपास 29 विकास कामांच्या माध्यमातून आदिवासी बहुल क्षेत्रातील नागरिकांच्या दळणवळण विषयक समस्या मार्गी लागणार असल्याचे जैन यांनी म्हटले आहे.

Road
MBBS: भावी डॉक्टरांसाठी गुड न्यूज! राज्यात एमबीबीएसच्या जागांमध्ये दीड हजारांची वाढ होणार!

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरततोंडी-कोरंभी, प्रतापगड-खोकरी, बोंडगाव-गांधारी, कढोली- बोंडगाव, रामनगर-संजयनगर, पांढरवाणी माल-झोडेटोली, गोठणगाव - आश्रमशाळा, झाशीनगर जोडमार्ग, प्रतापगड- खोकरी, बोंडगाव-गांधारी, कढोली- बोंडगाव, रामनगर-संजयनगर, पांढरवाणी माल झोडेटोली, सडक अर्जुनी तालुक्यातील बेहळीटोला जोड रस्ता, माहुली-बिरी, धानोरी-चिचटोला, धानोरी-लेंडेझरी, टेकरीपार जोड रस्ता, कोकणा-परसोडी, रेंगेपार-मोका- शिटोला, खोबा-गोंविदखोबा, कोकणा बायपास मार्ग, रामकनेरी-कोकणा, पाथरगोठा-कन्हारटोला, आंभोरा-परसटोला, केळवद-गवर्राटोला, केळवद-गवर्राटोला, केळवद-गवर्राटोला तसेच सालेकसा तालुक्यातील कारुटोला-चिचटोला व रामाटोला-कुलभरट्टी या रस्ता बांधकामाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com