Gondia : गोंदिया ZP चा मोठा निर्णय; 'अशी' करणार 8 कोटींची बचत

Gondia ZP
Gondia ZPTendernama
Published on

गोंदिया (Gondia) : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) योजना राबविण्यात येत आहे. मात्र, वीजबिल न भरल्याने पाणीपुरवठा कनेक्शन खंडीत केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा ठप्प होतो. ही समस्या लक्षात घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीपुरवठा योजना वीजजोडणीऐवजी सौरऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील जवळपास 900 पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालविण्यात येणार असल्याने वर्षाकाठी 8 कोटी रुपयांची वीजबिलाची बचत करणे शक्य होणार आहे.

Gondia ZP
Nashik : पेलिकन पार्कच्या टेंडरमध्ये कमी दराने काम करणारे ठेकेदार केले अपात्र

सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या योजनेचे काम आता युद्धपातळीवर सुरू केले आहे. प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने जलजीवन मिशन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतून प्रत्येक घरापर्यंत

पाणी पोहोचविले जाणार आहे. मात्र, अनेक पाणीपुरवठा योजना वीजजोडणीवर चालविल्या जात आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला दरमहा लाखो रुपयांचे वीजबिल भरावे लागते. वीजबिल वेळेवर न भरल्यास पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला जातो. वीजपुरवठा खंडित केल्याने ग्राहकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.

Gondia ZP
Nashik : जलजीवनची चुकीची कामे तपासणीसाठी मंत्रालयातून आले पथक

ग्राहकांना विहिरी आणि बोअरवेलचे दूषित पाणी वापरावे लागते. पाणीपुरवठा योजनांची वीजजोडणी खंडित झाल्याने अनेक योजना बंद पडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने वीजजोडणीऐवजी सौरऊर्जा उपकरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे वीजबिलांमध्ये अंदाजे 8 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

सौरऊर्जेची उपकरणे लावण्याचे काम सुरू

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात 1222 योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यापैकी 900 योजनांवर 33 किलोवॉट सौरऊर्जेची उपकरणे बसविण्यात येणार असून, त्याचे कामही सुरू झाले आहे. लवकरच सौरऊर्जेद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी प्रत्येक घरात पोहोचेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com