Gondia : मोठा दिलासा; गोंदियातील 250 कोटींची 'ती' योजना मंजूर

Gonida
GonidaTendernama
Published on

Gondia News गोंदिया : रेल्वे मार्गामुळे गोंदिया शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. गोंदिया शहराच्या इतर भागासाठी म्हणजे रेलटोली संकुलाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी गटार योजनेसाठी शासनाकडून 250 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

Gonida
GOOD NEWS : मराठवाड्यातील मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना मिळाला न्याय; हे आहे कारण

आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींचे प्रश्न मार्गी लागले. शहरातील घाण पाणी गटारींद्वारे एकाच ठिकाणी जमा करून ते प्रक्रिया करण्यासाठी प्लांटमध्ये न्यावे लागते. या योजनेमुळे शहरवासीयांची शहरातील अस्वच्छतेपासून सुटका होणार आहे. ही गटार योजना अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार असून, भुयारी गटार योजनेच्या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही आमदार अग्रवाल यांनी सांगितले. सध्या शहराच्या इतर भागात सुरू असलेल्या गटार योजनांच्या समस्या पाहता नवीन गटार योजनेच्या बांधकामातील सर्व अडचणी लक्षात घेऊन कामाचे नियोजन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत गोंदिया शहरातील मलनिःस्सारणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंजूर असलेली भूमिगत गटार योजना पहिले 125 कोटीत होणार होती. मात्र हा खर्च 125 कोटींवरून 250 कोटींवर पोहोचला आहे. गोंदियात 2013 मध्ये 125.72 कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी देण्यात आली होती. ही योजना समन्वयाचा अभाव आणि जागेची निवड न झाल्याने रखडली होती. आता जागेची निवड सुद्धा झालेली आहे.

Gonida
ठाण्यातील 'त्या' पायाभूत प्रकल्पांसाठी 6 बलाढ्य कंपन्या रेसमध्ये

गोंदिया शहरातील बहुचर्चित आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली भूमिगत गटार योजना मागील 8 वर्षांपासून रखडली होती. शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत गोंदिया शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेत शहरातील गटांराच्या माध्यमातून गोळा केलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यासाठी जागेचा अभाव व निकषांप्रमाणे जागा उपलब्ध होत नसल्याने योजनेला अधिक विलंब होत होता. मात्र ही समस्या आता दूर होणार आहे. 

मलशुद्धीकरण केंद्र पांगोली नदीजवळ खसरा येथे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. याबाबत आमदार अग्रवाल यांनी विविध आढावा बैठकीतून पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच मंत्रालयातही विषय रेटून धरला होता. शेवटी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या यंत्रणेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. गोंदिया शहरातील सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी गटारांची व्यवस्था करण्यात आली. परंतु या खुल्या गटारींमुळे शहरात सर्वदूर दुर्गंधी, घाण व जमिनीचे वाद पुढे येऊ लागले होते. परंतु आता सगळ्या समस्यांचा विचार करून नवीन गटार योजना कार्यान्वित केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com