गडकरींचा विदर्भात उड्डाणपुलांची उद्घाटने अन् भूमीपूजनांचा धडाका

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : महारेलकडून (MahaRail) महाराष्ट्रात अत्याधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. विदर्भात महारेलकडून उभारण्यात आलेल्या 6 उड्डाणपुलांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच वेळी सहा उड्डाणपुलांचे उद्घाटन पार पडले आहे. त्याच बरोबर या वेळी गडकरींच्या हस्ते अजनी ब्रिजसह नव्या पाच उड्डाणपुलांचे भूमीपूजन करण्यात आले.

Nitin Gadkari
Good News : जिल्हापरिषदेत होणार 561 रिक्त पदांची भरती

नागपुरात जुन्या ब्रिटीशकालीन अजनी उड्डाणपुलाच्या जागी 6 लेन ट्वीन केबलस्टेड ओव्हर ब्रिज उभारण्यात येणार असून, त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. हा उड्डाणपूल दोन टप्प्यात बांधण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सध्याची वाहतूक विस्कळीत न होता तीन पदरी ट्वीन केबलस्टेड ब्रिजचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, वाहतूक नवीन केबल स्टेड रोड ओव्हर ब्रिजकडे वळवली जाईल आणि दुसरा तीन लेन केबल स्टेड ब्रिज बांधण्यासाठी सध्याचा पूल पाडला जाईल. हा पूल रंगीबेरंगी एलईडी दिव्यांनी उजळून निघणार असून, त्यात सेल्फी पॉइंट्सही असतील, यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेलच, शिवाय पर्यटकांसाठी ते आकर्षणही ठरेल.

या पुलांमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि परिसरात राहणा-या लोकांचा प्रवास अधिक सुकर होईल. तसेच या क्षेत्राचा सर्वांगीण आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

Nitin Gadkari
Old Mumbai-Pune हायवेवरही आता पाळावी लागणार लेनची शिस्त, अन्यथा...

महारेलने बांधलेल्या उड्डाणपुलांचे वैशिष्ट्य

अनेकदा आपण पाहतो की, वीज, दूरध्वनी, इंटरनेट इत्यादींच्या केबल्स उड्डाणपुलावर अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसतात. त्यामुळे अपघात होऊ शकतो आणि पुलाचे सौंदर्य देखील बिघडू शकते. हे लक्षात घेऊन, महारेलने विशिष्ट केबल डक्टची तरतूद केली आहे जी उड्डाणपुलाच्या क्रॅश बॅरियरमधील सर्व केबल्स सुरक्षित करेल. या विशेष केबल डक्टचा वापर महारेल आपल्या सर्व उड्डाणपुलांमध्ये करत आहे.

डेकोरटीव आर्च आणि एल ई थीम लाइटस

महारेलने बांधलेल्या सर्व उड्डाणपुलाच्या सजावटीसाठी डेकोरटीव आर्चचा वापर केला जात आहे, ज्यामध्ये रंगीत एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. याशिवाय, मुंबई आणि नागपूर येथे महारेलकडून बांधण्यात येणाऱ्या केबल स्टेड उड्डाणपुलांवरही दुरून नियंत्रित अशी 'विशेष आर्किटेक्चरल एलईडी थीम लाइटिंग वापरली जात आहे. त्यामुळे परिसराची शोभा वाढेल. भविष्यात या पुलांवरील विजेचा खर्च कमी करण्यासाठी (ऊर्जा वापर) महारेल प्रत्येक पुलासाठी पारंपरिक सौरऊर्जेचे नियोजन करत आहे.

Nitin Gadkari
Sambhajinagar : 300 कोटी खर्चूनही बीड बायपासकरांचा प्रवास धोकादायक

या उड्डाणपुलांचे भूमीपूजन

रेल्वे फाटक क्र. 6 (3AB- 3t) भुयारी मार्ग, स्थळ मांजरी आणि पिंपळकुट्टी स्टेशन (जिल्हा यवतमाळ), रेल्वे फाटक क्र. 2B दोन मार्गिका उडाणपूल, मांजरी ते पिंपळकुट्टी स्टेशन दरम्यान (जिल्हा यवतमाळ), रेल्वे फाटक क्र. 52 A दोन मार्गिका उड्डाणपूल, चांदूरबाजार ते नरखेड स्टेशन दरम्यान जिल्हा वर्धा, रेल्वे फाटक क्र. 662 / 22N दोन मार्गिका उडाणपूल, बडनेरा ते अमरावती स्टेशन दरम्यान (जिल्हा अमरावती), रेल्वे फाटक क्र. S-2 दोन मार्गिका उड्डाणपूल, बडनेरा आणि अमरावती स्टेशन दरम्यान, त्याचबरोबर विद्यमान अजनी उडाणपुलाच्या जागी नवीन सहा मार्गीका ट्विन केबलस्टेड उड्डाणपूल हे 600 कोटीच्या निधीतून बनविण्यात येणार आहेत. यात केंद्र शासनाच्या सेतू बंधन योजने अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारचा वित्तीय सहभाग असणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com