Gadachiroli News गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ख्याती असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मार्कंडा देवस्थानच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे जीर्णोद्धाराच्या कामाला गती येणार आहे.
मुख्य मंदिराच्या जीर्णोद्धार व संवर्धनाकरिता 20 कोटी 81 लाख रुपये, पुलाची निर्मिती करण्यासाठी 5 कोटी 50 लाख रुपये, धर्मशाळेची सुधारणा करण्यासाठी 1 कोटी रुपये, घाट व कपडे बदलण्याच्या जागेसह नदी परिसराचे सुशोभीकरण 15 कोटी 86 लाख रुपये, 5 मीटर रुंदीचा रस्ता बांधकामासाठी 17 कोटी 50 लाख रुपये, घाट व कपडे बदलण्याच्या जागेसह नदी परिसराचे सुशोभीकरण 1 कोटी 83 लाख, माहिती केंद्र (800 चौरस मीटर) 6 कोटी 50 लाख रुपये अशा प्रकारे मार्कंडा देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा निधी वर्ग झाला असून कामाला गती येणार आहे. लवकरच काम सुरू केले जाणार असून, कामाचे टेंडर काढले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली आहे.
23 जून रोजी मार्कंडादेव येथील मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची आमदार डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली. यावेळी उपसरपंच उमाकांत जुनघरे, गजानन भांडेकर, पुरातत्त्व विभागाच्या शिवाणी शर्मा, भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख, जयराम चलाख, भाऊजी दहेलकर, प्रतीक राठी, वसंत चौधरी, भोजराज भगत, विशेष दोषी, रामचंद्र वरवाडे, प्रिया म्हस्कोल्हे, सुषमा आत्राम व स्थानिक नागरिक उपस्थित होते.