अकोला (Akola) : अकोला- पूर्णा विद्युतीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून अकोला ते हिंगोली असा १२६ किलोमीटरचा अखंड विद्युतीकरण रेल्वे मार्गाचे विद्युत जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी अकोला-वाशीम मार्गाचे काम पूर्ण झाले होते. त्यात आता वाशीम ते हिंगोली या ४६.३० किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण सर्व विभागांमध्ये वेगाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून, हिंगोली-वाशिम दरम्यान ४६.३० किलोमीटर अंतराचा आणखी एक विभाग पूर्ण झाला आहे. त्यामुळे अकोला-पूर्णा विद्युतीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून कार्यान्वित झाला आहे. यासह, अकोला- हिंगोली स्थानकांदरम्यानचा १२६ किलोमीटरचा अखंड विद्युतीकरण करून, रेल्वे मार्गांची अखंड कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यात आली आहे.
या टप्प्यात केले काम पूर्ण
अकोला-पूर्णा विभागाचे २०९ किलोमीटरचे विद्युतीकरण २०१७-१८ मध्ये २७७ कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह मंजूर करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून, मार्च २०२१ मध्ये अकोला-लोहोगड दरम्यान ३४.५ किमी अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. लोहोगड-वाशीम दरम्यान ४५.३ आरके मीटरचे विद्युतीकरण मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाले आहे. पुढच्या टप्प्यात हिंगोली डेक्कन -पूर्णा या ८४ किलोमीटर अंतरासाठी शिल्लक विभागातील विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.
इंधन खर्च कमी, प्रदूषणालाही आळा
महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणामुळे बळकट केली जातील आणि मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीची अखंडित हालचाल प्रदान करणे सोयिस्कर होणार आहे. अकोला-हिंगोली मार्गावरील खोळंबा कमी होण्यास मदत होणार आहे. या विभागांमधील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण इंधन खर्च कमी करून रेल्वेला खूप फायदेशीर ठरणारे आहे. याशिवाय पर्यावरणपूरक देखील आहे. विद्युतीकरणामुळे कार्बन फुटप्रिंटचे उत्सर्जन कमी होणार आहे.