Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

Devendra Fadnavis:अमरावती जिल्ह्यात 'या' पुनर्वसनाला लवकरच मान्यता

Published on

मुंबई (Mumbai) : अमरावती जिल्ह्यातील निम्न पेढी प्रकल्पांतर्गत ततारपूर आणि सावरखेड पुनर्वसनाचे प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. गणोजादेवी संदर्भातील प्रस्ताव तातडीने मागवून पुढील 3 महिन्यात या पुनर्वसन प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सांगितले.

Devendra Fadnavis
Maharashtra : तुकडेबंदीच्या निर्णयाबाबत सरकारने उचलले मोठे पाऊल

याबाबत सदस्य रवी राणा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. फडणवीस म्हणाले, निम्न पेढी प्रकल्पाचे जवळपास 90 टक्के काम झाले आहे. परंतु 10 टक्के काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. याबाबत लवकरच बैठक घेऊन कालमर्यादेत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच 50 घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
CM: मुंबईच्या विकासाची रखडपट्टी संपली, असे का म्हणाले मुख्यमंत्री?

'निम्न तापी'चा समावेश पीएम कृषी सिंचन योजनेत करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार -
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाचा असलेला निम्न तापी पाडळसे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त सहाय्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य संजय सावकारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा 6.6 टीएमसी चा प्रस्ताव प्राप्त झाला आहे परंतु तो प्रस्ताव 4 टीएमसीचा अपेक्षित असून याबाबत पुनर्प्रस्ताव मागवण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Mumbai : 'हे' आमदार निवास 18 महिन्यांत होणार 'हायटेक'

बोर, धाम प्रकल्पातील दुरुस्ती कामांना गती-
वर्धा जिल्ह्यातील बोर व धाम हे सिंचनाच्या दृष्टीने महत्वाचे प्रकल्प आहेत. परंतु जुना प्रकल्प असल्याने कालवे व वितरण प्रणाली जीर्ण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे नुकसान होत आहे. त्यासाठी या प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत सदस्य पंकज भोयर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी एका महिन्यात विस्तृत प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

Tendernama
www.tendernama.com