Nagpur : जलयुक्त शिवार अभियान 2.0च्या पहिल्या टप्प्यात 6 लाख 32 हजार 896 कामे पूर्ण

Jalyukt Shivar 2.0
Jalyukt Shivar 2.0Tendernama
Published on

नागपूर (Nagpur) : जलयुक्त शिवारमुळे 39 लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता म्हणजे एकूण 27 लाख टीसीएम किंवा 27 कोटी टँकरस् एवढी साठवण क्षमता निर्माण केली जाणार आहे. अशी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

Jalyukt Shivar 2.0
एमटीएचएलचे 98 टक्के काम पूर्ण; प्रकल्प खर्चात 2 हजार कोटींची वाढ

जलयुक्त शिवार अभियान 2.0 ची अंमलबजावणी वेगाने व्हावी यासाठी  सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल जी मुथा, एटीइ चंद्रा फाऊंडेशनच्या के. अवंती व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 2014 ते 2019 या काळात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांना फायदा झाला. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने पुन्हा एकदा जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्याचे ठरविले आहे.

Jalyukt Shivar 2.0
Nagpur ZP: रस्ते, तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 17 कोटींचा प्रस्ताव; नवीन वर्षात मंजुरी मिळणार का?

1 लाख 57 हजार 142 एवढी केली जाणार कामे :

सध्या या अभियानांतर्गत 5,775 गावे निवडण्यात आली असून मंजूर कामांची संख्या ही 1 लाख 57 हजार 142 एवढी आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत तलावांसोबतच नाल्यांतील गाळ काढण्याची कामेही आता हाती घेतली जातील. जलयुक्त शिवार ही एक लोकचळवळ झाली असून यासाठी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्याच्या तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी नवीन पदनिर्मिती करण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या. जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये 22 हजार 593 गावात हे अभियान राबविण्यात आले व त्यामध्ये 6 लाख 32 हजार 896 कामे पूर्ण केली. या अभियानामुळे एकूण 20 हजार 544 गावे जलपरिपूर्ण होऊन 27 लाख टी.सी.एम. म्हणजे 27 कोटी टँकर इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे 39 लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे. 2014 ते 2019 या काळात राबविल्या गेलेल्या अभियानाचे हे यश आहे. सरकार आणि जनतेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात जलक्रांती घडवेल, असा  विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शविला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com