माजी पालकमंत्र्यांची कामे थांबवणार सध्याचे पालकमंत्री, कारण...

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : माजी पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी डीपीसीचा सर्वाधिक निधी फक्त आपल्याच उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघालाच दिल्याच्या तक्रारींची दखल घेऊन विद्यमान पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व प्रस्तावाची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. विशेष म्हणजे राऊत यांनी आपल्या मतदारसंघासाठी १०३ कोटींच्या निधीतून कामाने नियोजन केले होते.

Devendra Fadnavis
गोरगरिबांना 'दिवाळी किट'चे टेंडर 'या' कंपनीकडे; ५१३ कोटींचा खर्च

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत माजी पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर जवळपास सर्वांचा रोख होता. त्यांनी आपल्या मतदार संघातच कामे नेल्याचा पाढा भाजप आमदरांना वाचला. त्यामुळे मागील बैठकीचे इतिवृत्तही कायम झाले नसून २०२२-२३ या वर्षातील कामांचीही फेर तपासणी होणार असल्याने विकास कामांना अप्रत्यरित्या स्थगितीच राहणार असल्याचे दिसते. येत्या काळात माजी पालकमंत्री राऊत यांना मोठा धक्का बसणार असल्याचे दिसून येते.

Devendra Fadnavis
शिंदे-फडणवीसांच्या 'या' निर्णयाने ठेकेदार, आधिकारी का झाले खुश?

बैठकीत नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त कायम ठेवण्याचा विषयासह वर्ष २०२२-२३ साठी मंजूर निधी व खर्चाचा लेखाजोखा सादर केला. राऊत यांनी दलितेत्तर लेखाशीर्ष अंतर्गत मिळणारा सर्वाधिक निधीचे आपल्याच मतदारसंघात नियोजन केले. खनिज प्रतिष्ठानचा निधीही त्यांनीच घेतला. राऊत यांच्या नावाचा उल्लेख टाळत एकाच मतदार संघात खनिज प्रतिष्ठानचा ३९ कोटींचा निधी मंजूर झाला असून कोटींच्या निविदाहा काढण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमदारांना न सांगतात निधी त्यांनी घेतल्याच्या तक्रारी कृष्णा खोपडे, आशीष जयस्वाल, समीर मेघेसह इतर आमदारांनी केल्या. मागील कामांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. निधीबाबत आमदारांनी दिलेल्या पत्रावरही उत्तर मिळत नसल्याचा मुद्दा समीर मेघे यांनी उपस्थित केला. यावर्षी मंजूर निधी पैकी ६४ कोटींची कामे एकाच मतदार संघात असून एकच प्रस्ताव १९ कोटींचा असल्याचा मुद्दा सुनिल केदार यांनी उपस्थित केला. हे काम राऊत यांच्या मतदार संघातील असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com