नागपूर (Nagpur) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत देशातील कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नियो मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. यात विदर्भातील आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश करण्यात येणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले नागपूर मेट्रो रेल्वेचा किलोमीटरचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येईल. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्राची मंजुरी घेण्यात येणार आहे. तत्वतः मंजुरी यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. दुसरा टप्पा ४३. ८ किलोमीटर लांबीचा आहे. कापसी येथील ट्रांसपोर्ट नगर ते हिंगणा, उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेकडे बुटीबोरी एमआयडीसी मेट्रो पोहचेल. दुसऱ्या टप्प्याचा आराखडा आधीच तयार करण्यात आला आहे. यात थोडाफार बदल केला जाणार आहे. समृद्धी कॉरिडॉरच्या बाजूलाच हाय स्पेड ट्रोन धावणार आहे. येथे मालवाहतुकीसाठी लॉजिस्टिक कॉरिडॉर उभारला जाईल. पतंजलीचा प्लांटही लवकरच सुरू करण्याच्या प्रयत्न आहे. मिहानमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. मोठमोठे उद्योजक नागपूरमध्ये येण्यास उत्सूक आहेत. असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पेट्रोकेलमिकल कॉम्प्लेक्स विदर्भात उभारण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. मध्यंतरी ते चंद्रपूरला येऊन गेले. त्यावेळी त्यांनी यास तत्वतः मान्यता दिली. रिफायनरी विदर्भात आणली जावी अशी मागणी सातत्याने उद्योजकांमार्फत केली जात आहे. मात्र रिफायनरी समुद्र तटावरच अधिक व्हायबल आहे. त्यामुळे या बाबत सध्याचा काही सांगता येत नाही.